ETV Bharat / city

पुणेकर निर्धास्त; बाजारपेठांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा - pune corona news today

शहरातील विविध बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर याचा वापर बाजारपेठांमध्ये सर्वसामान्य पुणेकर करताना दिसत नाहीत. जणू काही कोरोना संपलाय की काय, असा अविर्भाव दिसून येत आहे.

Pune
author img

By

Published : Dec 13, 2020, 2:03 PM IST

Updated : Dec 13, 2020, 3:11 PM IST

पुणे - शहरात डिसेंबर महिन्यातील सुरवातीच्या आठवड्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहता शहरात दरोरोज 200 ते 300 रुग्णांची वाढ होत आहे. मात्र शहरातील विविध बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर याचा वापर बाजारपेठांमध्ये सर्वसामान्य पुणेकर करताना दिसत नाहीत. जणू काही कोरोना संपलाय की काय, असा अविर्भाव दिसून येत आहे.

दरोरोज 200 ते 300 रुग्णांची वाढ

शहरातील कोरोनाबधित रुग्णांमध्ये दरोरोज 200 ते 300 रुग्णांची वाढ होत आहे. नोव्हेंबर महिन्यात काही प्रमाणात रुग्ण संख्येत वाढ होत होती. तेव्हा कोरोनाची दुसरी लाट तर नाही आली ना, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र त्यानंतर डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात दरोरोज 200 ते 300 रुग्णांची वाढ होत आहे तर दरोरोज 250 ते 350 बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात येत आहे. शहराची सध्या 5150 अ‌ॅक्टिव्ह रुग्ण असून आतापर्यंत शहरात 1, 73, 719 पॉझिटिव्ह रुग्ण आहे. आजपर्यंत शहरात 1, 64, 033 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

नागरिकांच्या मनातील भीती कमी झाली

कोरोनाच्या सुरवातीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांमध्ये कोरोनाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात भीती होती, मात्र जसे रुग्ण संख्या कमी होत गेली, तशी नागरिकांमध्ये भीती कमी होत गेली आणि शहरातील रस्त्यांवर, बाजारपेठांमध्ये नागरिक सर्रास विनामास्क फिरत आहेत.

प्रशासनाकडून वारंवार आवाहन

कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासन आपल्या पद्धतीने उपाययोजना करत आहे. कोरोनाच्या बाबतीत जनजागृती करत आहे. मात्र प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद न देता काही पुणेकर मात्र बिनधास्त झाले आहेत. शहरातील मध्यभागी असलेल्या महात्मा फुले मंडई, लक्ष्मीरोड, तुळशीबाग अशा बाजारपेठांमध्ये काही नागरिक तर काही विक्रेते बिनधास्त फिरत आहेत. एकेकाळी कोरोनाच हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहरातील नागरिकांना आता कोरोनाची भीतीच नसल्याचे दिसत आहे.

शहरात एकूण 4536 कोरोना रुग्णांचा मृत्यू

पुणे शहरात आत्तापर्यंत 4536 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरोरोज सरासरी 6 ते 10 कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. शहरात अशी परिस्थिती असली तरी नागरिक आता बिनधास्त आहेत. काही जण नियमांचे पालन करत आहेत तर काही मात्र आम्हाला काहीही होत नाही, अशाच मानसिकतेत फिरत आहेत.

प्रशासनाकडून चौका-चौकांत कारवाई

महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून चौकाचौकात विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाई होत आहे. मात्र ही कारवाई फक्त चौका-चौकात होत आहे. शहरातील बाजारपेठांमध्ये नागरिक मात्र सर्रास फिरत आहेत. बाजारपेठांमध्ये कधीतरी अचानक विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई होत आहे. त्यामुळे सर्रासपणे फिरणाऱ्या पुणेकरांना कोणतीही भीती नसल्याचे जाणवत आहे.

रुग्णसंख्येत घट मात्र खबरदारी हवी

शहरात रुग्णसंख्या जरी कमी होत असली, तरी अजून कोरोनावर लस आलेली नाही. म्हणून कोरोनाने जी नवीन जीवनशैली स्वीकारण्यास आपल्याला भाग पाडले आहे. ती जीवनशैली अजून तरी काही काळ आपल्याला स्वीकारावी लागेल. नाहीतर तर पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ होत गेली, तर याला त्याला दोष देण्यात काहीच अर्थ राहणार नाही.

Last Updated : Dec 13, 2020, 3:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.