पुणे - सध्या गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यात संघर्ष पाहायला मिळत आहे. आता शिवतीर्थावर दसरा मेळावा कोण घेणार यावरून चर्चा रंगली आहे. दरम्यान, याबाबत आमदार शहाजी बापू पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, की हा दसरा मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील व्हावा ही आमची आपेक्षा आहे. Dussehra Gathering कारण स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या शिवसेनेचे नेतृत्व सध्या एकनाथ शिंदे करत आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात हा मेळावा व्हा ही अपेक्षा आहे असही बापू म्हणाले आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली आहे असही ते म्हणाले आहेत.
शिवसेना वाचवण्यासाठी हा निर्णय याबरोबरच ज्यांची संस्कृतीच खोके घेण्याची आहे त्यांची अचानक सत्ता गेल्याने ते आता भ्रमिष्ट झाले आहेत. त्यामुळे ते गद्दार, पन्नास खोके, अशी टीका करत आहेत असा टोलाही पाटील यांनी यावेळी लगावला आहे. तसेच, साधा ग्रामपंचायत सदस्य फुटत नाही. आम्ही पन्नस लोक कसे फुटु शकतात असा प्रश्न करत आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला आहे. पुण्यातील मार्केटयार्ड येथील शारदा गजानन मंडळातर्फे दर वर्षी दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे वितरण आणी कबड्डी व ढोल ताशा स्पर्धेचा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम झाला त्यावेळी शहाजी बापू माध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच बाळासाहेबांचे वारसदार, योग गुरू रामदेवबाबांची स्तुतीसुमने