पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार उत्तम कामगिरी करत आहे. ( Performance of Narendra Modi's government 2021 ) मात्र, देशात लोकशाही आहे. मोदींच्या विरोधात एकत्र येऊन वातावरण निर्माण करण्यात विरोधी पक्ष यशस्वी झालाच तर काय होईल माहीत नाही. पण आजच्या स्थितीत भारतीय जनता पक्ष 418 जागांच्या खाली येणार नाही, असे सर्वेच्या माध्यमातून सामोर येत आहे अस मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. ( Sawai Gandharva Festival 2021) सवाई गंधर्व महोत्सवाला 50 टक्के उपस्थितीची परवानगी मिळावी या मागणीसाठी चंद्रकांत पाटील यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची आज भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
सरकारने देशात 44 कोटी जनधन बँकेची खाती उघडल्यानंतर, 7 कोटी घरात शौचालय झाली आहेत, ( New Jandhan Bank Accounts ) 3 कोटी लोकांना घर मोफत मिळाल्यानंतर आणि आता 70 हजार कोटींची 'हर घर पाणी' योजना आल्यानंतर अनेक महिलांच्या डोक्यावरचा हंडा जाणार आहे. प्रत्येक घरी, गावागावात नळाने पाणी येणार आहे. हे सर्व झाल्यानंतर लोकं मोदींनाच मतदान करणार आहेत, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला आहे.
सवाईगंधर्व 50% उपस्थित करण्याची परवानगी द्यावी
नाशिक येथे अखिल भारतीय साहित्य संमेलन उत्साहात पार पडले, मग सवाई गंधर्व महोत्सवाला 25 टक्के उपस्थितीचे बंधन का ? हे अन्यायकारक आहे असही पाटील म्हणाले आहेत. सवाईगंधर्व 50% उपस्थित करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी पाटील यांनी केली. जगभरातील रसिक सवाई गंधर्व महोत्सवाची वाट पाहत असतात. मागील दोन वर्षापासून तो कोविडमुळे झाला नाही. परंतु, आता दोन वर्षानंतर कोविडची भीती कमी झाली आहे. जनजीवन देखील सुरु झाले. साहित्य संमेलन देखील नाशिकला मोठ्या उत्साहात पार पडले. परंतु सवाई गंधर्वला मात्र उपस्थितीला 25% परवानगी हे अन्यायकारक आहे असे पाटील म्हणले.
एल्गार परिषदेनंतर शनिवारवाड्यावर होणाऱ्या कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली
सवाई गंधर्वच्या संयोजकांनी आता थांबू नये असं आवाहनही पाटील यांनी यावेळी केले. ते म्हणाले, नियम रोजच बदलत असतात. त्यामुळे 50 टक्के परवानगीसाठी अर्ज करून तुम्ही तयारीला लागा. काहीही करून या वर्षी सवाई गंधर्व होणार असल्याचा विश्वासही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. दरम्यान, सांस्कृतिक कार्यक्रमांना शनिवारवाड्यावर परवानगी द्या अशी मागणीही पाटील यांनी केली आहे. एल्गार परिषदेनंतर शनिवारवाड्यावर होणाऱ्या कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. शनिवारवाडा हे शहरातील मध्यवर्ती केंद्र असून याठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाना बंदी घालणे अनाकलनीय आहे. तरी, तेथे होणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना पूर्वी प्रमाणेच परवानगी द्यावी अशीही मागणी पाटील यांनी केली आहे.