ETV Bharat / city

पुणे पदवीधर शिक्षक मतदारसंघ : विजयाचा कोटा ठरण्यासाठी रात्रीचे 9 वाजणार

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतमोजणी प्रक्रियेला बालेवाडीच्या श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलात सुरुवात झाली आहे. या दोन्ही मतदारसंघातील निकाल पहिल्या पसंतीच्या मतांमध्येच लागणार, की पुढील फेऱ्यांची मतमोजणी करावी लागणार, याबाबत अद्याप स्पष्ट नाही.

पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतमोजणी
पुणे पदवीधर शिक्षक मतदारसंघ : विजयाचा कोटा ठरण्यासाठी रात्रीचे 9 वाजणार
author img

By

Published : Dec 3, 2020, 1:18 PM IST

पुणे - पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतमोजणी प्रक्रियेला बालेवाडीच्या श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलात सुरुवात झाली आहे. या दोन्ही मतदारसंघातील निकाल पहिल्या पसंतीच्या मतांमध्येच लागणार, की पुढील फेऱ्यांची मतमोजणी करावी लागणार, याबाबतचे अद्याप स्पष्ट नाही. पदवीधरसाठी रात्री नऊ वाजताच्या सुमारास तर शिक्षक मतदारसंघाचे चित्र सायंकाळी सात वाजेपर्यंत स्पष्ट होऊ शकते, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.

पुणे पदवीधर शिक्षक मतदारसंघ : विजयाचा कोटा ठरण्यासाठी रात्रीचे 9 वाजणार

प्रत्यक्ष मतमोजणी ३ वाजता

सकाळी आठ वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. सुरुवातीला विभागातील पाच जिल्ह्यांच्या मतपत्रिका तसेच पोस्टल मत पत्रिका एकत्र करण्यात आल्या. पदवीधरसाठी 867 पोस्टल तर शिक्षकसाठी 32 पोस्टल मतपत्रिका प्राप्त झाल्या असून त्याचे सरमिसळ करण्याचे काम सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी दुपारचे दोन वाजणार आहेत. त्यानंतर दुपारी 3 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार असून वैध-अवैध मतं बाजूला करत असतानाच पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी केली जाणार आहे.

निकालाला उशिर होणार

पोस्टल मतदानासह पदवीधर मतदारसंघासाठी 2 लाख 47 हजार 917 तर शिक्षक मतदारसंघासाठी 53 हजार 19 मतदान झाले आहे. या सर्व मतपत्रिका एकत्र करून त्यातल्या वैध आणि अवैध मतपत्रिका वेगळ्या करण्यात येत आहेत. यातच विजयाचा कोटा ठरण्यासाठी रात्रीचे नऊ वाजू शकतात, असे विभागीय आयुक्तांनी सांगितले. जर या प्रक्रियेत एखाद्या उमेदवाराने विजयासाठीचा कोटा पूर्ण केला, तर शिक्षक मतदारसंघाचा निकाल साधारण सायंकाळी 7 वाजता तर पदवीधरचा निकाल रात्री नऊ वाजता लागू शकतो.

पहिल्या पसंतीच्या मतामध्येच विजय मिळवण्यासाठी वैध मतदान भागिले 2, अधिक 1 मत आवश्यक आहे. त्यामुळे एकतर्फी निवडणूक झाल्यास रात्री नऊ वाजता निकाल अपेक्षित आहे. पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण न झाल्यास दुसऱ्या पसंतीची मते मोजली जाणार आहेत. ही प्रक्रिया करण्याची वेळ आल्यास त्याच्या पदवीधर साठी 60 फेऱ्या तर शिक्षकसाठी 32 फेऱ्या घ्याव्या लागणार आहेत. प्रत्येक फेरीसाठी अंदाजे अर्धा तास वेळ गृहीत धरल्यास निकाल लागण्यासाठी आज रात्री 9 नंतर पुढे 30 तास पदवीधरसाठी लागू शकतात. तर शिक्षक साठी 16 तास लागू शकतात, असा प्रशासनाचा अंदाज आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.