ETV Bharat / city

Army Paper Scam : लष्करात नोकरी लावतो असे सांगून फसवणूक , तिघांना अटक

लष्करात नोकरी लावण्यासाठी तरुणांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांनी अटक ( Pune Military Intelligence Arrested Three People ) केली आहे. त्यांनी यापुर्वी 36 जणांना नोकरी लावल्याचे समोर आले आहे.

Army Paper Scam
Army Paper Scam
author img

By

Published : Jan 7, 2022, 2:13 PM IST

Updated : Jan 7, 2022, 5:20 PM IST

पिंपरी चिंचवड : लष्करात नोकरी लावतो असे सांगून फसवणूक ( Get Job Army ) करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. पुण्याच्या मिलिटरी इंटिलीजन्सने ही कारवाई ( Pune Military Intelligence Arrested Three People ) केली. पुढील तपासासाठी त्यांना सांगवी पोलिसांच्या ( Sangavi Police Station ) ताब्यात देण्यात आले आहे. गजानन पुरुषोत्तम मिसाळ ( वय, 23 ) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. सतीश कुंडलिक डहाणे, श्रीराम बनाजी कदम आणि अक्षय देवलाल वानखेडे, अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गजानन मिसाळ आणि त्याचे सहकारी बीआरोमधील मोटर मॅकेनिक या पदाच्या भरतीसाठी सतीश डहाणे, अक्षय देवलाल वानखेडे भेटण्यासाठी औंध रक्षक चौक येथे आले होते. तेव्हा 70 हजार रुपये देताना पुण्याच्या मिलिटरी इंटेलिजन्सने ताब्यात सर्वांना ताब्यात घेतले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, यापुर्वी 31 ऑक्टोबर मोटर मेकॅनिकल ची भरती झाली होती. त्यामध्ये 36 जणांना नोकरी लावल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आरोपींकडे प्रश्नपत्रिका कोठून आली याचा तपास पोलीस करत असल्याची माहिती, आयुक्त कृष्ण प्रकाश ( Pcmc Police Commissioner Krushna Prakash ) यांनी दिली.

आयुक्त कृष्ण प्रकाश प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

लष्कर भरती घोटाळा?

आरोपींकडून लष्कर भरतीसाठी लागणारी सर्व कागदपत्रे जप्त केली आहे. तसेच, दोन रबरी शिक्के, पेनड्राइव्ह, कॉम्प्युटर, मिलिटरी चे बनावट ओळखपत्र, कामांडन्ट ग्रेफ सेंटर यांचे अक्नोलेजकार्ड, बीआरओ चे भरतीचे अडव्हटाईज नंबर- 2/ 2021 उमेदवारांचे भरलेले फॉर्म तसेच, शैक्षणिक पात्रतेची झेरॉक्स, आधार कार्ड, पॅन कार्ड, आटीलरी नाशिक रोड कॅम्प यांचे अप्लिकेशन फॉर्म हे ताब्यात घेतले आहे. त्याचप्रमाणे अधिक झडती केली असता दोन लाखांपेक्षा अधिक रक्कम आढळून आली. यामुळे लष्कर भरती प्रकरणात मोठा घोटाळा झाल्याचं पुढे आल्याने दिल्लीपासून गल्लीपर्यंत मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

एका उमेदवाराकडून अशा प्रकारे घ्यायचे पैसे

एका उमेदवाराकडून पाच लाख रुपये घेतले असल्याचे यावेळी समोर आले आहे. फॉर्म भरताना 50 हजार, लष्कर भरती परीक्षा झाल्यावर 2 लाख पोस्टिंग झाल्यास 2 लाख 50 द्यायचे अस ठरले होते.

हेही वाचा - Temporary relief to Varvara Rao : ज्येष्ठ कवी वरवरा राव यांना 5 फेब्रुवारी पर्यंत तात्पुरता दिलासा

Last Updated : Jan 7, 2022, 5:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.