ETV Bharat / city

विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच मिळणार लस; पुणे मनपाकडून लसीकरणाला सुरुवात - corona vaccination in pune

पालकमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीत दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण अनेक विद्यार्थ्यांचे व महाविद्यालयातील कर्मचारी यांचे लसीकरण अद्याप झालेले नाही. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने महाविद्यालयात लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात सुमारे २०० लसीकरण केंद्र असले तरी आता त्यात महाविद्यालयांची भर पडणार आहे.

पुणे लसीकरण
पुणे लसीकरण
author img

By

Published : Oct 25, 2021, 8:42 PM IST

पुणे - मागील आठवड्यापासून पुणे शहरात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार शहरातील महाविद्यालय सुरू करण्यात आली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आजपासून (सोमवारी) पुणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील बहुतांश महाविद्यालयात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मॉडेल महाविद्यालयातून लसीकरण मोहिमेला शुभारंभ करण्यात आला.

पालकमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीत दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण अनेक विद्यार्थ्यांचे व महाविद्यालयातील कर्मचारी यांचे लसीकरण अद्याप झालेले नाही. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने महाविद्यालयात लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात सुमारे २०० लसीकरण केंद्र असले तरी आता त्यात महाविद्यालयांची भर पडणार आहे. १८ वर्षांवरील ज्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे लसीकरण न झालेले नाही त्यांच्यासाठी महापालिकेतर्फे थेट महाविद्यालय परिसरातच लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हेही वाचा-पट्टणकोडोली विठ्ठल-बिरदेव यात्रा : यंदा भरपूर पाऊस, कडधान्य महाग होणार- भाकनुक

विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच मिळणार लस

पुणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात 50 लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. महाविद्यालय सुरू करण्यात आल्यानंतर लसीकरणामुळे कोणताही विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहू नये, म्हणून महापालिकेच्या माध्यमातून शहरातील महाविद्यालयांत लसीकरणाला सुरुुवात झाली आहे. या लसीकरणाच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेले नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण या मोहिमेद्वारे करण्यात येणार असल्याचे पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

हेही वाचा-माझे नाव दाऊद कधीच नव्हते - समीर वानखडे यांच्या वडिलांचे स्पष्टीकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.