पुणे - महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणि परंपरा असलेल्या दहिहंडीच्या प्रो गोविंदा स्पर्धा घेण्याची घोषणा आज गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांनी विधानसभेत केली. स्पर्धेसाठी बक्षीसाची रक्कम शासनातर्फे देण्यात येईल. त्याचबरोबर खेळाडू संवर्गातून शासकीय नोकरी देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर विद्यार्थी हे आक्रमक झाले असून विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेला विरोध दर्शविला आहे.
विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आमचा विरोध आहे. वर्षानुवर्ष विद्यार्थी म्हणून आम्ही स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करत असतो आणि कुठेतरी आपल्याला सरकारी नोकरी मिळेल, अशी आशा विद्यार्थ्यांना असते. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होताना दिसून येत आहे. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी आमची मागणी आहे, असे यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी शर्मिला येवले यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - Shinde Fadnavis government शिंदे फडणवीस सरकारच्या 25 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर