ETV Bharat / city

धक्कादायक... बारावीत नापास झाल्याने युवकाची इमारतीवरून उडी घेत आत्महत्या - student Suicide in pune

आज इयत्ता बारावीचा निकाल लागला आहे. अनेक विद्यार्थी आज बारावीत उत्तीर्ण झाल्याने जल्लोष करत आहेत. पण अशातच पुण्यातील एका युवकाने टोकाचे पाऊल उचलले आहे. बारावीत नापास झाल्याने पुण्यातील निखिल लक्ष्मण नाईक या युवकाने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. पुण्यातील कोथरूड परिसरात ही घटना घडली आहे.

suicide
आत्महत्या केलेला तरुण
author img

By

Published : Jun 8, 2022, 7:05 PM IST

पुणे - पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. आज इयत्ता बारावीचा निकाल लागला आहे. अनेक विद्यार्थी आज बारावीत उत्तीर्ण झाल्याने जल्लोष करत आहेत. पण अशातच पुण्यातील एका युवकाने टोकाचे पाऊल उचलले आहे. बारावीत नापास झाल्याने पुण्यातील निखिल लक्ष्मण नाईक या युवकाने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. पुण्यातील कोथरूड परिसरात ही घटना घडली आहे.

निखिलने उचलले टोकाचे पाऊल - निखिल हा गरवारे महाविद्यालयात वाणिज्य शाखेचे शिक्षण घेत होता. बारावीचा ऑनलाईन निकाल लागणार हे समजल्यावर निकालाबाबत तो खूपच उत्सुक होता. दुपारी एकच्या सुमारास ऑनलाईन निकाल पत्रिकेत नापास झाल्याचे समजताच त्याने टोकाचे पाऊल उचलले. त्याने इमारतीच्या वर जाऊन उडी घेत आत्महत्या केली आहे.

इमारतीवरून उडी घेत केली आत्महत्या - निखिलने खाली उडी मारली त्यावेळी खाली उभ्या असलेल्या शेखर लहू लोणारे यांच्या अंगावर तो पडला. यामध्ये लोणारे हे गंभीर जखमी झाले आहेत. तर निखिलचा जागीच मृत्यु झाला. लोणारे यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. क्रिकेटची आवड असलेल्या निखिलने बॉडी बनवण्यासाठी जीम सुरू केली होती. तो शांत स्वभावाचा होता. निखिलचे वडील आचारी तर आई घरकाम करते. निखिलच्या जाण्यामुळे त्याच्या आई वडिलांना जबर धक्का बसला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.