पुणे - गेल्या काही दिवसांपासून पुण्यासह राज्यात कोरोनाचा वेग वाढत होता. राज्यात असणारा तोच वेग आता आटोक्यात येताना दिसत आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील काही गावांना आणखी कोरोनाच्या विळख्याने वेढा दिला आहे. पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हे आणि पुरंदर या 3 तालुक्यांचा अपवाद वगळता इतर 10 तालुक्यातील एकूण 42 गावात कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने ही गावे उच्च धोका गावे म्हणून जारी केले आहे. या गावात नियमाबरोबर कडक लॉकडाऊन करण्याच्या सूचनाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत.
ग्रामीण भागातील 600 हून जास्त गावं कोरोनामुक्त
42 या गावांमधील कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी कडक उपाययोजनांबरोबरच सर्वेक्षण, कोरोना चाचण्यांवर जास्त भर दिला जाणार असल्याचे सांगितले आहे. यंदा पुणे जिल्ह्यातील 194 गावातच कोरोनाबाधित आढळून येत आहेत. तसेच, 600 हून जास्त गावे कोरोनामुक्त झालीत. ग्रामीण भागातील 607 गावात गेल्या 3 आठवड्यापासून आतापर्यंत एकही बाधित सापडला नाही. तसेच या गावांपैकी 96 गावे ही खेडे तालुक्यातील आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीतून ही बाब समोर आली. 32 गावांपैकी दौंड उर्वरित जिल्ह्यातील 31 गावांमध्ये आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. कोरोनाची स्थिती चिंताजनक असलेल्या गावात 10 गावे ही जुन्नर तालुक्यातील आहेत. तसेच, बाकी 32 गावांपैकी दौंड आणि शिरूर तालुक्यातील प्रत्येकी 6, इंदापूर तालुक्यातील- 5, मावळ-4, आंबेगाव आणि खेड प्रत्येकी-3, मुळशी तसेच, बारामती प्रत्येकी- 2 आणि हवेली तालुक्यातील फक्त एका गावाचा समावेश आहे.
42 गावात ‘या’ प्रमुख गावाचा समावेश
मोरगाव (ता. बारामती)
देऊळगाव गाडा, देऊळगाव राजे, केडगाव, लिंगाळी, वरवंड (ता. दौंड)
बावडा, शेटफळगढे (ता. इंदापूर)
धोलवड, डिंगोरे, पिंपरी पेंढार (ता. जुन्नर)
बिरदवडी, खरपूड, कोयाळी (ता. खेड)
साळूम्बरे (ता. मावळ)
मारुंजी, सुस (ता. मुळशी)
कवठे, केंदूर, कोरेगाव भीमा, पाबळ, सादलगाव, सविंदणे (ता. शिरूर)
हेही वाचा - मराठा आरक्षण : ..तरच राज्याचे अधिकार अबाधित राहतील- चंद्रकांत पाटील