ETV Bharat / city

पुण्यातील 'या' 'राम मंदिराला आहे 268 वर्षांचा इतिहास - राम मंदिर

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला श्री राम मंदिराचा मुद्दा मार्गी लागल्यामुळे देशभरातील श्रीराम भक्तांमध्ये उत्साह आहे. देशभरातील श्रीराम मंदिरांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. अशाच पुण्यातील 268 वर्षांची परंपरा असणाऱ्या श्रीराम मंदिराचा हा खास रिपोर्ट...

Ram mandir in pune
पुण्यातील 'या' 'राम मंदिराला आहे 268 वर्षाचा इतिहास
author img

By

Published : Aug 3, 2020, 4:24 PM IST

पुणे - येत्या ५ ऑगस्टला अयोध्येतील श्रीराम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला श्रीराम मंदिराचा मुद्दा मार्गी लागल्यामुळे देशभरातील श्रीराम भक्तांमध्ये उत्साह आहे. देशभरातील श्रीराम मंदिरांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. अशाच पुण्यातील 268 वर्षांची परंपरा असणाऱ्या श्रीराम मंदिराचा हा खास रिपोर्ट...

'तुळशीबागेतील श्रीराम मंदिर' पुणे शहराच्या मध्यभागी असणाऱ्या तुळशीबाग परिसरात एक एकर जागेवर पसरलेले आहे. हे श्रीराम मंदिर अतिशय प्रशस्त आणि भव्य आहे. एकेकाळी पुणे शहराचं वैभव असलेले हे मंदिर श्रीमंत नारो अप्पाजी खिरे यांनी 1761 साली बांधलं. मंदिराची जागा पूर्वी सरदार खासगीवाल्यांची तुळशीची बाग म्हणून नारो अप्पाजींनी ही जागा विकत घेऊन त्यावर मंदिर बांधले. 1761 साली सुरू झालेल्या या मंदिराचं काम 1795 पर्यंत सुरू होतं. हे मंदिर उभारण्यासाठी तेव्हा 1 लाख 36 हजार 667 रुपये खर्च आला.

या मंदिराविषयी अधिक माहिती सांगताना मंदिराचे विश्वस्त आणि श्रीमंत नारो अप्पाजी खिरे यांची दहावे वंशज रघुनाथ तुळशीबागवाले म्हणाले, त्याकाळी इथं मोठी तुळशीची बाग होती. पेशव्यांच्या दरबारात सरसुभेदार असणाऱ्या श्रीमंत नारो अप्पाजी खिरे यांनी हे मंदिर बांधलं. त्यावेळी पेशवे सुद्धा या मंदिरात यायचे. याठिकाणी तेव्हा तुळशीच्या बागा असल्यामुळे पेशवे श्रीमंत नारो अप्पाजी खिरे यांना तुळशीबागवाले या नावाने बोलायचे. तेव्हापासून त्यांना तुळशीबागवाले हेच नाव पडलं.

तुळशीबाग परिसरातील श्रीराम मंदिर हा परिसर एक एकर जागेत पसरलेला आहे. मंदिराच्या उत्तर दक्षिण आणि पश्चिम दिशेला कमानी असलेले प्रवेशद्वार आहेत, तर उत्तरेकडील दरवाजावर नगारखाना आहे. मंदिराचा गाभारा दगडी षटकोनी असो त्यावर नक्षीकाम आहे. बाहेरचा गाभारा तीन खनी असून त्यावर मोठी घंटा आहे. मंदिराच्या सभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी प्रशस्त जागा आहे.

मंदिराचे शिखर अतिशय उंच असून त्यावर चार फुटांचा कळस आहे. शिखरावर अनेक साधूसंताच्या मूर्ती बसवल्या असून लहान लहान असे शंभर कळस आहेत. मंदिराचा देव्हारा लाकडी नक्षीदार असून त्यात दगडी चौथऱ्यावर राम लक्ष्मण आणि सीता यांची मूर्ती आहे. अंदाजे अडीच ते तीन फुटांच्या मूर्ती संगमरवरी असून अतिशय नाजूक आणि रेखीव आहेत.

मंदिराचा इतर परिसर वेगवेगळ्या देवतांच्या मंदिरांनी व्यापलेला आहे. मंदिराच्या शेजारी गजानन व महादेव नंदी पाठीमागे शेषशायी भगवान विठ्ठल रुक्माई आणि दत्तात्रयाचे मंदिर आहे. ही सर्व मंदिरे म्हणजे दगडी घडीव कामाचा उत्तम नमुना म्हणता येईल.

नगारखान्याचं वैशिष्ट्य

या श्रीराम मंदिरात पेशवे सातत्याने दर्शनासाठी येत असत. खर्ड्याच्या लढाईवर जात असताना त्यांनी मंदिरात येऊन या "लढाईत यश मिळालं तर मंदिरात त्रिकाल चौघडा सुरू करीन" असा नवस केला होता. त्यानंतर त्यांना खर्ड्याच्या लढाईत यश मिळालं आणि या मंदिरात नगारखाना सुरू करण्यात आला. अशी माहिती मंदिराचे विश्वस्तत रघुनाथ तुळशीबागवाले यांनी दिली.

मंदिराचे मुख्य पुजारी असलेले हेमंत काटे म्हणाले, या मंदिरात गुढीपाडव्यापासूनच राम मंदिर उत्सवाला सुरुवात होते. रामनवमीच्या दिवशी हजारो भाविक याठिकाणी येतात. भजन कीर्तन भक्ती गीत असे दहा दिवस या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. हनुमान जयंती, दत्त जयंती, महाशिवरात्री, आषाढी एकादशी या दिवशी मंदिरात मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडतात.

अयोध्येतील भूमिपूजन सोहळ्याविषयी बोलताना रघुनाथ तुळशीबागवाले म्हणाले, अयोध्येत मंदिर निर्माण होणे हे संपूर्ण भारतवासियांसाठी अभिमानाची बाब आहे. भारतातील महत्त्वपूर्ण अशी एक गोष्ट पुन्हा एकदा नव्याने उदयास येत आहे. त्यादिवशी आम्ही ही मंदिराची सजावट करणार आहोत आणि सरकारने परवानगी दिली तर येथे उत्सवही साजरा करणार आहोत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.