ETV Bharat / city

डॉक्टरांनी स्टँडर्ड आरटीपीसीआर किटच वापरावी - डॉ. अविनाश भोंडवे - RTPCR Information Dr Avinash Bhondwe

आरटीपीसीआर टेस्टच्या बाबतीत डॉक्टरांवर मोठी जबाबदारी आहे. डॉक्टर आणि पॅथॉलॉजी यांनी आरटीपीसीआर टेस्ट किट वापरताना स्टँडर्ड किटच वापरले पाहिजे, असे मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले.

Standard RTPCR Kit Dr Avinash Bhondwe
स्टँडर्ड आरटीपीसीआर किट
author img

By

Published : Jun 16, 2021, 8:32 PM IST

पुणे - आरटीपीसीआर टेस्टच्या बाबतीत डॉक्टरांवर मोठी जबाबदारी आहे. डॉक्टर आणि पॅथॉलॉजी यांनी आरटीपीसीआर टेस्ट किट वापरताना स्टँडर्ड किटच वापरले पाहिजे, असे मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले.

माहिती देताना डॉ. अविनाश भोंडवे

हेही वाचा - रांजणगाव : महिलेचा विनयभंग करून फरार झालेला आरोपी अखेर जेरबंद

ज्या वेळेला देशासह राज्यात कोविडची व्याप्ती वाढत होती, तेव्हा आपल्या येथे आरटीपीसीआर टेस्ट किटचा तुटवडा जाणवत होता. मागच्या वर्षी सुरवातीला मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात या किटचा तुटवडा जाणवत होता. त्यामुळे, आवश्यक तेवढे दिवसाला टेस्ट होत नव्हते, त्यामुळे सरकारकडून वेगवेगळ्या कंपन्यांना हे किट बनवण्यासाठी परवानगी देण्यात आली. आणि प्रमाणित असे किट तेव्हा बनवण्यात आले. परंतु, दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि आरटीपीसीआर टेस्टची जास्तीची गरज भासली आणि तेव्हा प्रामाणिभूत नसलेल्या किट बाजारात आल्या आणि त्यावरचे नियंत्रण कदाचित न झाल्याने बनावट किट बाजारात आल्याने अनेक रुग्णांचे निदान हे चुकीच्या पद्धतीने झाले असल्याची शक्यता आहे, असे मतही डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले.

सर्वत्र योग्य आणि विश्वासू म्हणून आरटीपीसीआर किटचा वापर

कोरोना संसर्गाच्या निदानासाठी आरटीपीसीआर टेस्ट केली जाते. जगभरात ही टेस्ट वापरली जाते. कोरोनाच्या निदानासाठी सर्वत्र योग्य आणि विश्वासू म्हणून आरटीपीसीआर टेस्टकडे पाहिले जाते. या टेस्टवर 95 टक्के विश्वास केला जातो. फक्त 5 टक्के यात निकाल चुकू शकतात. किंवा फॉल्स पॉझिटीव्ह फॉल्स निगेटिव्ह येऊ शकतो. ही किट अतिशय गुंतागुंतीच्या शास्त्रीय पद्धतीने बनवण्यात आली आहे. यात स्टँडर्ड काटेकोरपणे सांभाळावा लागतो. हे किट जर त्या पद्धतीने बनवले गेले नाही तर याची विश्वासार्हता कमी होईल. आणि याचे प्रमाणीभूत हे एफडीए किंवा आयसीएमआर तपासूनच पुढे बाजारात येत असते, अशी माहिती डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली.

डॉक्टरांनी स्टँडर्ड किटचाच वापर करावा

कोरोनाच्या या महासंकटात सर्वात महत्वाचे काम हे डॉक्टर करतच आहे, पण या टेस्टच्या बाबतीतही त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. डॉक्टर आणि पॅथॉलॉजी यांनी आरटीपीसीआर टेस्ट किट वापरताना स्टँडर्ड किटच वापरले पाहिजे. ज्या कंपन्याचे नाव एफडीए आणि आयसीएमआर यांनी दिले आहे त्याच कंपनीचे किट वापरायला हवे. काही आदर्श प्रयोगशाळा याच पद्धतीचे किट वापरतात. पण, काही ठिकाणी किंमत कमी आहे म्हणून बनावट किट वापरायचा प्रमाण असू शकतो, अशी शक्यता डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केली.

यात सरकारची महत्वाची जबाबदारी

राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांच्या दरात सरकारने वेळोवेळी बदल केले आहे. सरकारच्यावतीनेही आरटीपीसीआर टेस्ट किटची किंमत सुरवातीला 4 हजार आणि त्यांनतर 1 हजार 500 आणि मग 850 आणि आता 450 रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. किंमत कमी करताना अनेक पॅथॉलॉजीच्या दृष्टीने हा तोट्याचा विषय असल्याने काही ठिकाणी बनावट किटचा वापर झाला असेल. ही टेस्ट एखाद्या रुग्णाच्या जीवन मरणाचा विषय असतो. हे लक्षात घेता या किटचा वापर करायला हवे. यात सरकारची महत्वाची जबाबदारी आहे. ज्या कंपन्यांना प्रमाणभूत करण्यात आले आहे, अशाच कंपन्यांचे किट वापरले जाते की नाही, याची चौकशी केली पाहिजे. अन्य किट वापरले जाणार नाही याची योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे, असेही डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले.

हेही वाचा - बावडा खून प्रकरणातील फरार आरोपी ताब्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.