पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ( Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education ) मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल हा जाहीर झाला असून यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. सर्व विभागातून कोकण विभागाचा निकाल हा सर्वाधिक 99.27 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी नाशिक विभागाचा 95.90 एवढा लागला आहे.अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.
निकालाची ठळक वैशिष्ट्ये - या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,८४,७९० नियमित विद्याथ्र्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,६८,९७७ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १५,२१,००३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.९४ आहे. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण ५४,१५९ पुनर्परिक्षार्थी विद्याथ्र्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५२,३५१ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी ४१,३९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ७९.०६ आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाची उत्तीर्णतेची टक्केवारी ९९.२७ अशी सर्वाधिक असून सर्वात कमी उत्तीर्णतेची टक्केवारी नाशिक विभागाची ९५.९० अशी आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९७.९६ असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.०६ आहे. म्हणजेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा १.९० ने जास्त आहे. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण ८,१६९ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८,०२९ दिव्यांग विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी ७,५७९ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.४० आहे. एकूण २४ विषयांचा निकाल १००% टक्के लागला आहे.
विभागानुसार टक्केवारी - यंदाच्या निकालात पुणे विभागाचा निकाल हा 96.96% टक्के,नागपूर विभागाचा निकाल हा 97% टक्के, औरंगाबाद विभागाचा निकाल हा 96.33% टक्के, मुंबई विभागाचा निकाल हा 96.94% टक्के, कोल्हापूर विभागाचा 98.50% टक्के, अमरावती विभागाचा 96.81 % टक्के,नाशिक विभागाचा 95.90% टक्के, लातूर विभागाचा 97.27% टक्के, कोकण विभागाच 99.27% टक्के निकाल लागला आहे.
100 टक्के मिळवणारे 122 विद्यार्थी - यंदाच्या निकालात पुणे 5 नागपूर 0 औरंगाबाद 18 मुंबई 1 कोल्हापूर 18 अमरावती 8 नाशिक 1 लातूर 70 कोकण 1 असे एकूण 122 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहे. तर 90 टक्केंच्या पुढे गुण असलेले विद्यार्थी हे 83 हजार 60 विद्यार्थी, तर 85 ते 90 टक्के मिळालेले 1 लाख 49 हजार 200 विद्यार्थी हे आहे. 75 टक्के मिळालेले विद्यार्थी हे 2 लाख 18 हजार 624 आणि 70 टक्के मिळालेले विद्यार्थी हे 2 लाख 10 हजार 638 विद्यार्थी आहे.
0 ते 10 टक्के असलेले शाळा 1 तर 0 टक्के लागलेल्या शाळा या 29 - यंदाच्या निकालात 0 ते 10 टक्के निकाल असलेले शाळा या एकूण राज्यभरातून एकच असून विशेष म्हणजे 0 टक्के मिळालेल्या 29 शाळा आहे.
अशी आहे आकडेवारी -
- राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यापैकी ६,५०,७७९ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, ५,७०,०२७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २,५८,०२७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, (४२, १७० विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
- राज्यातील २२,९२१ माध्यमिक शाळांतून १६,३८,९६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १२,२१० शाळांचा निकाल १००% लागला आहे.
- मार्च २०२० च्या तुलनेने मार्च-एप्रिल २०२२ मध्ये उत्तीर्णतेची टक्केवारी १.६४ ने जास्त आहे.
- खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या २१,५३० असून २०,५९८ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १७,३५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८४.२३ आहे.