पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 2 वर्ष सर्वच सण उत्सव निर्बंध साजरी करावी लागले. यंदा मात्र निर्बंध मुक्त झाल्याने सर्वच सण उत्सव हे मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणाच्या निमित्ताने पुणे शहरातील बाजारपेठ हे सजले, असून ठिकठिकाणी पणत्या, आकाशकंदील, लक्ष्मी हे विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. तसेच अनेक संस्था संघटनांच्या माध्यमातून देखील पणत्या आणि आकाशकंदील बनविण्याचे काम केलं जातं आहे. पण पुण्यातील जांभुळवाडी येथील अक्षरस्पर्ष या संस्थेतील विशेष मुलांनी आणि निराधार महिलांनी यंदाच्या दिवाळीत तब्बल 1 लाख आकाशकंदील आणि पणत्या बनविण्यात आले आहेत.
अक्षरस्पर्ष या नावाने संस्था सुरू गेल्या 10 वर्षापासून पुण्यातील कात्रज या ठिकाणी विशेष मुलांसाठी म्हणजेच दिव्यांग, मतिमंद मुलांसाठी अक्षरस्पर्ष नावाने संस्था सुरू केली. या संस्थेची संस्थापिका दिपाली निखळ यांचा मुलगा हा विशेष असल्याने आपल्या मुलाला आयुष्यात आलेल्या अडचणी इतर विशेष मुलांना त्यांच्या आयुष्यात तसेच त्यांच्या आई वडिलांना त्रास होऊ नये, म्हणून निखळ यांनी अक्षरस्पर्ष या नावाने संस्था सुरू केली. आणि आज ते या संस्थेच्या माध्यमातून विशेष मुलांना शिक्षण आणि विविध वस्तू बनविण्याचे शिकवत आहे.
सण उत्सवात वस्तू बनविणे शिकवलं जात संस्थेत 20 हून अधिक विशेष मुलं असून या मुलांना शिक्षणा सोबतच विविध सण उत्सवात वस्तू बनविणे शिकवलं जातात. यंदाच्या दिवाळीत या विशेष मुलांच्या माध्यमातून 1 लाख पणत्या आणि आकाश कंदील बनविण्यात आले आहे. या दिवाळी वस्तू बाजारात विक्री, तसेच संस्था संघटनांना विक्री केले जातं आहे. विशेष म्हणजे या मुलांनी बनविलेले पणत्या आणि आकाश कंदील या अमेरिकेतील एका कंपनीने मागवले आहे.