ETV Bharat / city

Pune Murder मुलाने नातवाच्या मदतीने आईच्या शरीराचे केले नऊ तुकडे, पुणे हादरले!

author img

By

Published : Sep 6, 2022, 8:45 PM IST

Updated : Sep 6, 2022, 9:35 PM IST

माणुसकीला काळीमा फासणारी घटना पुण्यात घडली आहे. मुलानेचं नातवाच्या मदतीने स्वतःच्या आईचा खुन केला आहे. दृश्यम चित्रपट पाहून नातवाने आजीचे कटरने 9 तुकडे केले. बापानेचं आपल्या मुलाला स्वतःच्या आईचा खून करण्यासाठी प्रोत्साहित केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे आरोपी संदीप गायकवाड हा रिपब्लिकन पक्ष ऑफ मातंग आघाडीचा शहराध्यक्ष आहे. दोन्ही आरोपींना 7 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Pune Murder
पुण्यात मुलाने नातवाच्या मदतीने केला आईचा खुन

पुणे माणुसकीला काळीमा फासणारी घटना पुण्यात घडली आहे. मुलानेचं नातवाच्या मदतीने स्वतःच्या आईचा खुन केला आहे. दृश्यम चित्रपट पाहून नातवाने आजीचे कटरने 9 तुकडे केले. बापानेचं आपल्या मुलाला स्वतःच्या आईचा खून करण्यासाठी प्रोत्साहित केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे आरोपी संदीप गायकवाड हा रिपब्लिकन पक्ष ऑफ मातंग आघाडीचा शहराध्यक्ष आहे. दोन्ही आरोपींना 7 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुलाने नातवाच्या मदतीने आईच्या शरीराचे केले नऊ तुकडे

कसा घडला प्रकार? मृत महिला देहूरोड येथे आर्मी कॅम्पमध्ये कामास होती. पण रिटायरमेंट नंतर ती केशवनगर येथे राहायला आली. सुन आणि सासूत बाचाबाची व्हायची. मृत महिलेच्या नावावरील घर, दागिने यावर नजर ठेवून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. घरात आजी उषा गायकवाड आणि आरोपी नातू साहील ऊर्फ गुडडु गायकवाड हे दोघेच होते. दुपारी तीन वाजताच्या दरम्यान त्याची आजी उषा गायकवाड वय ६२ वर्ष या घरात झोपले असताना, आजीचे कटरने 9 तुकडे केले.

दृश्यम चित्रपट पाहून नातवाने आजीचे कटरने केले 9 तुकडे आजी उषा गायकवाड हिस बाथरूममधे ओढत नेवुन तीच्या शरीराचे इलेक्ट्रिक कटर मशिनने 9 तुकडे केले. व एका पिशवीत काही तुकडे भरून तो वापरत असलेल्या वेस्पा दुचाकी गाडी व चारचाकी स्वीफ्ट गाडीमधे भरून प्रथम केशवगर येथील जॅकवेल कचराडेपोचे मागील बाजुचे मुळा मुठा नदीपात्रावरील नदीत टाकले. बाकीचे 3 पोते तुकडे थेऊर येथील नदीच्या पुलावरून वाहत्या पाण्यात टाकले होते.

मुंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी साहिल हा ग्राफिक डिझायनर असून तो मोठ्या प्रमाणात युट्युब वर क्राईम संदर्भात व्हिडिओ बघत असेल. तसेच अनेक वेळा त्याने दृश्यम हा चित्रपट देखील पाहिला आहे. तसेच तो क्राइम पेट्रोल देखील पाहत होता. आणि हे पाहूनच त्याने आपल्या स्वतःच्या आजीचे नऊ तुकडे करून विल्हेवाट लावली आहे. आरोपींना 7 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Last Updated : Sep 6, 2022, 9:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.