ETV Bharat / city

मद्यधुंद कारचालकाने धडक दिल्याने सॉफ्टवेअर अभियंत्याचा पुण्यात मृत्यू - Software engineer dead

अंकुर खंडेलवाल (वय 38) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. चंदननगर पोलिसांनी याप्रकरणी कारचालक जोविम्सन जेम्स (वय 30) त्याला अटकही केली होती. त्यानंतर कोर्टातून त्याला एका दिवसात जामीनही मिळाला होता.

software engineer dead
software engineer dead
author img

By

Published : Mar 9, 2021, 6:52 PM IST

पुणे - पुण्याच्या चंदननगर परिसरात शनिवारी रात्री एका मद्यधुंद चालकाने भरधाव वेगात गाडी चालवून तिघांना जोराची धडक दिली. या अपघातात उपचार सुरू असताना एका सॉफ्टवेअर इंजिनियरचा मृत्यू झाला. अंकुर खंडेलवाल (वय 38) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. चंदननगर पोलिसांनी याप्रकरणी कारचालक जोविम्सन जेम्स (वय 30) त्याला अटकही केली होती. त्यानंतर कोर्टातून त्याला एका दिवसात जामीनही मिळाला होता.

Software engineer dead
Software engineer dead

सिमेंटची भिंत जमीनदोस्त

याप्रकरणी अधिक माहिती अशी, की या तीन मृत अंकुर खंडेलवाल हे चंदननगर परिसरातील कुमार पिपरा सोसायटीत राहतात. शनिवारी रात्री ते पत्नी आणि मुलासह शेजारच्या इमारतीत राहणाऱ्या नातेवाईकांकडे गेले होते. त्यानंतर रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी परत जात असताना ही दुर्घटना घडली. खंडेलवाल दाम्पत्य हे फुटपाथवरून जात असतानाही भरधाव वेगात आलेल्या गाडीने त्यांना जोराची धडक दिली. त्यानंतर ही गाडी पुढे जाऊन एका भिंतीला ही धडकली. ही धडक एवढी जोरात होती, की सिमेंटची भिंत जमीनदोस्त झाली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अंकुर खंडेलवाल यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर उपचार सुरू असताना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता त्यांचा मृत्यू झाला.

कठोरात काठोर शिक्षा करण्याची मागणी

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर चंदननगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालक जोविम्सन जेम्स याला अटकही केली. मद्यधुंद अवस्थेत तो कार चालवत असल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केले असता काही तासात त्याला जामीनही मिळाला. परंतु त्याने मद्यधुंद अवस्थेत कार चालवून ज्या व्यक्तीला धडक दिली होती, तिचा मात्र रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अंकुर खंडेलवालांचे वय ३८ होते. त्याच्या मागे पत्नी आणि आठ वर्षाचा मुलगा आहे. त्यांच्या मृत्यूने खंडेलवाल कुटुंबीयांवर मात्र आभाळ कोसळले. आरोपीला आता कठोरात काठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी खंडेलवाल कुटुंबीयांकडून होत आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.