ETV Bharat / city

Anna Hajare admitted in hospital अण्णा हजारे उपचाराकरिता रुबी हाॅल रुग्णालयात दाखल

मुख्य ह्रदविकारतज्ज्ञ डॉ. परवेज ग्रँट आणि डॉ. सी.एन. मखळे यांनी अण्णा हजारे यांच्या ह्रदयाची अँजिओग्राफी चाचणी केली. त्यामध्ये त्यांच्या ह्रदयामधील रक्तवाहिनीत थोडे ब्लॉकेज दिसून आले. डॉ. परवेज ग्रँट यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अण्णा हजारे
अण्णा हजारे
author img

By

Published : Nov 25, 2021, 9:05 PM IST

पुणे - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ( Social worker Anna Hajare ) यांना पुण्याच्या रुबी हाॅल रुग्णालयात ( Pune Ruby Hall hospital ) दाखल करण्यात आले आहे. अण्णांना ह्रदयासंबंधी थोडासा त्रास जाणवत असल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली आहे. डाॅक्टर अण्णांच्या तब्येतीवर विशेष लक्ष ठेवून आहेत.

अण्णांच्या ह्रदयात छोटे ब्लाॅकेज ( Heart blockage in Anna Hajares heart ) आढळून आले आहेत. पण काळजी करण्यासारखे काही कारण नाही, असे रुबी रुग्णालयातील डाॅक्टरांनी सांगितले आहे.

हेही वाचा-IT Raid : पुण्यात प्रसिद्ध उद्योजकाच्या घरावर आयकर विभागाचा छापा

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून छातीत दुखण्याचा त्रास

रुबी हॉल क्लिनिकने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार अण्णा हजारे यांना गेल्या दोन ते तीन दिवसांपासून छातीत दुखत होते. त्यांना गुरूवारी रुबी हॉल क्लिनिकमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासले. यानंतर त्यांची 'इसीजी' तपासणी करण्यात आली असता त्यामध्ये ह्रदयाच्या कार्यपध्दतीमध्ये काही बदल आढळून आले.

हेही वाचा-महाविकास आघाडीच ठरलं! सलग दुसऱ्या वर्षी हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार

ह्रदयामधील रक्तवाहिनीत थोडे ब्लॉकेज

मुख्य ह्रदविकारतज्ज्ञ डॉ. परवेज ग्रँट ( Heart specialist Parvej Grant ) आणि डॉ. सी.एन. मखळे यांनी ( Dr C N Makhale on Anna Hajare Health ) अण्णा हजारे यांच्या ह्रदयाची अँजिओग्राफी चाचणी ( angiography test on Anna Hajare ) केली. त्यामध्ये त्यांच्या ह्रदयामधील रक्तवाहिनीत थोडे ब्लॉकेज दिसून आले. डॉ. परवेज ग्रँट यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा-‘कामावर हजर व्हा अन्यथा...’; एसटी कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्र्यांचा 24 तासांचा अल्टीमेटम

अँजिओप्लास्टी करण्याची गरज नाही-

अण्णा हजारे यांच्या ह्रदयात किरकोळ ब्लॉक आढळून आले आहेत. ह्रदयामध्ये असे किरकोळ ब्लॉकेज असतात. त्यावर अँजिओप्लास्टी करण्याची गरज पडत नाही. यावर त्यांना काही औषधोपचार देण्यात आले आहेत. सध्या त्यांची तब्येत स्थिर आहे. त्यांना येत्या दोन ते तीन दिवसांत घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य विश्वस्त डॉ. परवेज ग्रँट यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.