ETV Bharat / city

Raj Thackeray Aurangabad Speech : 'औरंगाबादेत दंगली झाल्यास सर्वस्वी राज ठाकरेच जबाबदार' - राज ठाकरे औरंगाबाद सभा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Mosques Loudspeakers) यांनी मशिदीवरील भोंग्यांच्याविरोधात घेतलेल्या भूमिकेने राज्यातील राजकारण तापले आहे. राज ठाकरे यांच्या या भूमिकेच्या विरोधात आत्ता डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने (Social Democratic Party of India) आवाज उठवला आहे. जर औंरंगाबादमध्ये दंगल झाल्यास सर्वस्वी राज ठाकरे जबाबदार असतील, असे स्पष्ट मत डेमोक्रॅटिक पार्टीचे अध्यक्ष अझहर तांबोळी (SDPI Secretary Azhar Tamboli) यांनी व्यक्त केले आहे.

Social Democratic Party of India
डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया
author img

By

Published : Apr 18, 2022, 8:00 PM IST

Updated : Apr 18, 2022, 9:12 PM IST

पुणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Mosques Loudspeakers) यांनी मशिदीवरील भोंग्यांच्याविरोधात घेतलेल्या भूमिकेने राज्यातील राजकारण तापले आहे. राज ठाकरे यांच्या या भूमिकेच्या विरोधात आत्ता डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने (Social Democratic Party of India) आवाज उठवला आहे. स्वतःच्या स्वार्था राजकारणासाठी राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला वेठीस धरू नये. तसेच जर औंरंगाबादमध्ये दंगल झाल्यास सर्वस्वी राज ठाकरे जबाबदार असतील, असे स्पष्ट मत डेमोक्रॅटिक पार्टीचे अध्यक्ष अझहर तांबोळी (SDPI Secretary Azhar Tamboli) यांनी व्यक्त केले आहे.

डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया

दंगे झाले तर सर्वस्वी जबाबदार राज ठाकरेच - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुस्लिम समाजाला भोंगे काढण्याचा 3 मे पर्यंत इशारा दिला आहे. या मुद्द्यावरून आता राज्यभरात राजकारण चांगलेच तापू लागले आहे. त्याला आता सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने याबाबत आक्षेप घेतला आहे. राज ठाकरे औरंगाबाद येथे घेत असलेल्या जाहीर सभेला पोलिसांनी परवानगी नाकारावी आणि परवानगी दिली तर त्यातून जर काही दंगे झाले तर त्याला सर्वस्वी जबाबदार राज ठाकरेच असतील, असे स्पष्ट मत डेमोक्रॅटिक पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

भोंगे उतरवण्याबाबत आणि कुठलाही सामाजिक प्रश्न मुस्लिम समाजावर येऊनच का थांबतात. त्यासाठी इतर समाजात देखील असे प्रश्न नाहीत का? असा सवाल देखील या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. आम्ही पोलीस प्रशासनाला आवाहन करणार आहोत की, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या राज ठाकरे यांना थांबवले पाहिजे, ही सर्वस्वी पोलिसांची जबाबदारी आहे. अन्यथा दंगे झाले तर त्याला सर्वस्वी राज ठाकरे जबाबदार असतील, असा इशारा डेमोक्रॅटिक पार्टीकडून देण्यात आला आहे.

इफ्तार पाऱ्यांवर बहिष्कार टाका - आम्ही मुस्लिम समाजास आवाहन करत आहोत की, राजकारणासाठी नेहमीच मुस्लिम समाजास आरोपीच्या पिंजऱ्या उभे करण्यात येत आहे. तथाकथित धर्मनिरपेक्ष म्हणवणारे राजकीय पक्ष देखील शांत राहून मूक संमती देत आहेत. या समाजाच्या प्रश्नावर बोलण्यास तयार नाहीत. अशा राजकीय पक्षातर्फे रमजान महिन्यामध्ये ठेवण्यात येणाऱ्या राजकीय अथवा शासकीय इफ्तार पाऱ्यांवर बहिष्कार करण्याचे आवाहन देखील यावेळी तांबोळी यांनी केलं आहे.

Last Updated : Apr 18, 2022, 9:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.