ETV Bharat / city

Smriti Irani program Fight : राष्ट्रवादी महिला कार्यकर्ता मारहाण प्रकरण; भाजपच्या 3 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

author img

By

Published : May 17, 2022, 10:24 AM IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी स्मृती इराणी ( Smriti Irani program Fight ) यांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी केली. तेव्हा भाजपाच्या पुरुष कार्यकर्त्याने राष्ट्रवादीच्या महिला आंदोलक वैशाली नागवडे ( Smriti Irani program news ) यांच्या कानशिलात मारल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये भाजपच्या 3 कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.

ncp women party worker beating case
स्मृती इराणी कार्यक्रम मारहाण

पुणे - काल भाजप नेत्या स्मृती ईराणी यांचा पुण्यातील बालगंधर्व येथे कार्यक्रम झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी स्मृती इराणी ( Smriti Irani program Fight ) यांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी केली. तेव्हा भाजपाच्या पुरुष कार्यकर्त्याने राष्ट्रवादीच्या महिला आंदोलक वैशाली नागवडे ( Smriti Irani program news ) यांच्या कानशिलात मारल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये भाजपच्या 3 कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.

महिला कार्यकर्त्यावर हात उचलल्याचे दृश्य

हेही वाचा - Minister Smriti Irani Pune : 'काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षाला पराभूत केल्यामुळेच काँग्रेस-राष्ट्रवादीचे माझ्यावर राग'

या प्रकरणी 1) भस्मराज तीकोने रा. कसबा पेठ, पुणे 2) प्रमोद कोंढरे रा. नातू बाग, पुणे 3) मयूर गांधी रा. शुक्रवार पेठ, पुणे यांच्या विरुद्ध डेक्कन पोलीस स्टेशन गु.र.नं.57/22 भादवि कलम 354, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल बालगंधर्व रंगमंदिर येथे भारतीय जनता पार्टी, पुणे शहराच्या वतीने 'अमित शाह आणि भाजपाची वाटचाल' या पुस्तकाचे प्रकाशन महिला व बाल कल्याण केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बालगंधर्व रंगमंदिर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली नागवडे यांच्यासह 3 महिला कार्यकर्ते रंगमंदिर येथे बसलेले असताना भाजप कार्यकर्त्यांनी जय श्रीराम अशा घोषणा दिल्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो, अशा घोषणा दिल्या. त्या ठिकाणी निर्माण झालेला गोंधळ पाहून तातडीने बंदोबस्तास असलेल्या महिला पोलीस अंमलदारांनी त्या महिलांना सुरक्षित ताब्यात घेऊन नाट्यगृहा बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असता काही भाजपच्या पुरुष कार्यकर्त्यांनी या महिला कार्यकर्त्यांना मारहाण केली.

वैशाली नागवडे यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही कार्यकर्त्यांविरुद्ध विनयभंगाची तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार उपलब्ध व्हिडिओ क्लिप्स पाहून खात्री करून तीन भाजप कार्यकर्ते भस्मराज तीकोने, प्रमोद कोंढरे, मयूर गांधी यांच्या विरुद्ध डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

हेही वाचा - Congress Women Wing Agitation Pune : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी विरोधात महिला काँग्रेसकडून आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.