ETV Bharat / city

Raghunath Kuchik Case : राजकीय भांडवलासाठी मुलींबाबतच्या केसेसचा वापर नको - निलम गोऱ्हे - बलात्कार पीडितेच्या चित्रा वाघ यांच्यावर आरोप

शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा आरोप ( Raghunath Kuchik Case ) करण्याऱ्या पीडित तरुणीने आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. चित्रा वाघ ( BJP Leader Chitra Wagh ) यांनी आपल्याला सुसाईड नोट लिहायला लावल्याचा धक्कादायक आरोप या पीडित मुलीने केला आहे. यावर राजकीय भांडवल करण्यासाठी मुलींबाबतच्या गुन्ह्यांचा वापर करायला नको, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी ( Shivsena Leader Neelam Gorhe ) दिली आहे.

निलम गोऱ्हे
निलम गोऱ्हे
author img

By

Published : Apr 12, 2022, 7:28 PM IST

पुणे - शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा आरोप ( Raghunath Kuchik Case ) करण्याऱ्या पीडित तरुणीने आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. चित्रा वाघ यांनी ( BJP Leader Chitra Wagh ) आपल्याला सुसाईड नोट लिहायला लावल्याचा धक्कादायक आरोप या पीडित मुलीने केला आहे. यावर राजकीय भांडवल करण्यासाठी मुलींबाबतच्या गुन्ह्यांचा वापर करायला नको, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी ( Shivsena Leader Neelam Gorhe ) दिली आहे.

पुरावे तयार करण्याची प्रयोगशाळा विरोधी पक्षांनी सुरू केली - स्त्री आधार केंद्राच्या वतीने वेळोवेळी त्या पीडित तरुणीला सहकार्य करण्यात आले आहे. पीडितेवर कोणी दबाव आणत असेल तर त्याची चौकशी होईल. अनेक प्रकरणात पुरावे तयार करण्याची प्रयोगशाळा विरोधी पक्षांनी सुरू केली की काय अशी शंका येत असल्याची टीकाही गोऱ्हे, यांनी केली.

सर्वच राजकीय पक्षांनी काही बंधने पाळणे आवश्यक - अनेकदा पीडितेच्या जबाबांमध्ये विसंगती येऊ शकते. पण, त्या महिलेला योग्य प्रकारचे समुपदेशन मिळाले तर मानसिक स्थैर्य मिळण्यासाठी मदत होते. या पीडितेच्या बाबतीत असे झाले नाही. मदतीच्या नावाने एखाद्या पीडितेचा वापर राजकीय हेतूने करणे अत्यंत अयोग्य आहे. याबाबत सर्वच राजकीय पक्षांनी काही बंधने पाळणे आवश्यक आहे. न्यायाच्या दिशेने झुकणारे सत्य लोकांसमोर आणणे महत्त्वाचे आहे. अन्यथा त्या स्त्रीला अपयशाच्या रस्त्यावर अर्ध्यावर सोडणे, असे होईल. पोलिसांकडून योग्य ती कारवाई होईल याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे, असेही देखील यावेळी गोऱ्हे म्हणाल्या.

हेही वाचा - Raghunath Kuchik Case : चित्रा वाघ यांच्या माणसांनीच माझं अपहरण केलं : कुचिक बलात्कार प्रकरणातील तरुणीचा गंभीर आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.