ETV Bharat / city

भाजपाची अवस्था म्हणजे 'मी नाही त्यातली अन् कडी लावा आतली', शिवसेनेची बोचरी टीका

author img

By

Published : Aug 21, 2021, 10:53 AM IST

या पक्षाला मिळेल त्या मार्गाने पैसे कमविण्याचे म्हणजे भ्रष्टाचाराचे वावडे कधीच नव्हते. त्याग, बलिदान, साधेपणा, जन आशीर्वाद हे चवदार पदार्थ फक्त तोंडी लावण्यापुरतेच. हेच लोक सध्या ऊठसूट मुंबई महानगरपालिकेवर निशाणा साधीत असतात, पण स्वतःच्या खुर्चीखाली काय जळते आहे, त्याचा मात्र त्यांना सोयीस्कर विसर पडतो. एखाद्या शहराची पुरती इज्जत काढणे म्हणजे काय? ते कालपरवा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत घडले असल्याची टीका शिवसेनेने भाजपावर केली आहे.

भाजपाची अवस्था म्हणजे '
भाजपाची अवस्था म्हणजे '

मुंबई - सगळ्यांच्या डोळ्यांदेखत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांच्या एजंटला 'लाच' स्वीकारताना पकडले यास भाजपवाल्यांनी षड्यंत्र म्हणणे म्हणजे भ्रष्टाचाराची व्याख्याच बदलण्यासारखे आहे. असे पैसे इतरांनी स्वीकारले तर तो भ्रष्टाचार, स्वतःचे बरबटलेले हात पोलिसांच्या बेड्यांत अडकले तर तो मात्र षड्यंत्राचा प्रकार, असल्याची बोंब भाजपाकडून ठोकली जात असल्याची टीका शिवसेनेने पक्षाचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून केली आहे. तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेस भ्रष्टाचाराचा अजगरी विळखा पडला आहे तो सोडवावाच लागेल. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांमधील विद्यमान कारभाराविषयी सांगण्यासारखे खूप आहे, पण या महान शहरांची इज्जत जाईल, अशी टीका शिवसेनेने या महापालिकांतील भाजपाच्या कारभारावर केली आहे.

भाजपाने पुणे शहराची इज्जत काढली-

भारतीय जनता पक्षाची अवस्था म्हणजे सध्या 'मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली' अशा प्रकारची झाली आहे. या पक्षाला मिळेल त्या मार्गाने पैसे कमविण्याचे म्हणजे भ्रष्टाचाराचे वावडे कधीच नव्हते. त्याग, बलिदान, साधेपणा, जन आशीर्वाद हे चवदार पदार्थ फक्त तोंडी लावण्यापुरतेच. हेच लोक सध्या ऊठसूट मुंबई महानगरपालिकेवर निशाणा साधीत असतात, पण स्वतःच्या खुर्चीखाली काय जळते आहे, त्याचा मात्र त्यांना सोयीस्कर विसर पडतो. एखाद्या शहराची पुरती इज्जत काढणे म्हणजे काय? ते कालपरवा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत घडले असल्याची टीका शिवसेनेने भाजपावर केली आहे.

या महापालिकेवर सध्या भाजपचा झेंडा आहे. त्यामुळे शहराच्या तिजोरीच्या चाव्याही याच मंडळींकडे आहेत, पण बुधवारी दुपारी स्थायी समिती अध्यक्षांच्या कार्यालयात 'एसीबी'ने म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांनी धाड घालून भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश केला. स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे, त्यांचे पी.ए. ज्ञानेश्वर पिंगळे आणि इतर तीन कर्मचाऱयांना 'एसीबी'च्या अधिकाऱयांनी अटक केली. एसीबीच्या अधिकाऱयांनी पैसे स्वीकारणाऱयांना रंगेहाथ पकडले व लगेच स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनात प्रवेश करून झडती घेतली. एखाद्या महानगरपालिकेत अशा प्रकारचे धाडसत्र प्रथमच झाले असेल. नाकाने कांदे सोलणाऱयांचे नाकच त्यामुळे कापले गेले असल्याची खोचक टीका शिवसेनेने भाजपावर केली आहे.

वाई शहराची इज्जत धुळीस-

घाऊक पक्षांतरे घडवून पिंपरी-चिंचवडची महानगरपालिका भाजपने जिंकली. विकास कामांच्या नावाखाली गेल्या काही वर्षांत ठेकेदारांनी महानगरपालिकेची लूट केली आहे. मात्र पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतल्या ढळढळीत भ्रष्टाचारावर कोणी बोलायचे नाही. कारण येथे भारतीय जनता पक्षाचा 'पारदर्शक' वगैरे कारभार सुरू आहे., असा टोलाही शिवसेनेने लगवाला आहे. पुणे, पिंपरी चिंचवडप्रमाणे नाशिक महानगरपालिकेतही घोटाळेच घोटाळे आहेत. 'लाच' प्रकरणात वाईच्या नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांना पदावरून हटविण्याचा निर्णय झालाच आहे. शहरातील शौचालयांच्या बांधकामाचे 'देयक' काढण्याच्या मोबदल्यात 14 हजार रुपयांची लाच वाईच्या नगराध्यक्षांनी मागितली व हा पैसा त्यांनी आपल्या पतीच्या हस्ते स्वीकारला. त्यांनाही रंगेहाथच पकडल्याने सांस्कृतिक, ऐतिहासिकदृष्टय़ा प्रसिद्ध असलेल्या वाई शहराची इज्जत धुळीस मिळाली असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

'ईडी'चे पथख भाजप पुरस्कृत -

मोदी लाटेतही घाऊक पक्षांतरे घडवून अनेक नगरपालिका, महानगरपालिका भाजपने जिंकल्या. कुठे थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडून आणले, पण शेवटी या 'घाऊक' मंडळींनी पक्षाचे व शहरांचे चेहरे विद्रूप केले. जनतेच्या पैशांची घाऊक लूट करायची व बोट मात्र फक्त मुंबईकडे दाखवायचे. हा यांचा कावा शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार महाराष्ट्रात आहे म्हणून. यातील प्रमुख मंडळींच्या मागे 'ईडी' वगैरे लावली जाणे हा तर नतद्रष्टपणाचा कळस असल्याचा आरोप करत शिवसनेने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत जे भ्रष्टाचाराचे प्रकरण दिवसाउजेडी घडले तेथे तुमचे ते 'ईडी'चे भाजप पुरस्कृत पथक घुसवणार आहात काय? असा रोख सवाल केला आहे.

इथे भाजपवाल्यांचा कांगावा असा की, येणाऱया आगामी महापालिका निवडणुकीत भाजपच्या हातून सत्ता काबीज करण्यासाठी हे षड्यंत्र आहे. आता यात कसले आले षड्यंत्र? महापालिकेच्या आवारात अगदी स्वच्छ सूर्यप्रकाशात सगळय़ांच्या डोळय़ांदेखत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांच्या एजंटला 'लाच' स्वीकारताना पकडले यास भाजपवाल्यांनी षड्यंत्र म्हणणे म्हणजे भ्रष्टाचाराची व्याख्याच बदलण्यासारखे आहे. असे पैसे इतरांनी स्वीकारले तर तो भ्रष्टाचार, स्वतःचे बरबटलेले हात पोलिसांच्या बेडय़ांत अडकले तर तो मात्र षड्यंत्राचा प्रकार! , असा टोला लगावला भाजपाला लगावला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.