Lok Sabha Election Live Updates :
- ६ वाजेपर्यंत ५९.५५ टक्के मतदान
- ३.४५ - दुपारी ३ वाजेपर्यंत ४१.८८ टक्के मतदान
- ०१.३०- दुपारी १ वाजेपर्यंत २३.९२ टक्के मतदान
- ११.४५- सकाळी ११ वाजेपर्यंत १८.६५ टक्के मतदान
- शिरुर लोकसभा मतदारसंघात पुणे ग्रामीण अधिक्षक संदीप पाटील यांची खेड तालुक्यातील मतदार केंद्रांना भेटी,
- मतदान केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार घडु नये यासाठी प्रशासन तयारीत
- राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी नारायणगावात बजावला मतदानाचा हक्क
- शिवसेनेचे उमेदवार शिवाजी आढळरावपाटील यांनी लांडेवाडी येथे सकाळी केले मतदान .
- राजगुरुनगर येथे मतदान केंद्राबाहेर उमेदवारांच्या नावाच्या स्लिप वाटत असताना शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते पोलीसांच्या ताब्यात कार्यकर्त्यांची पोलीस ठाण्यात चौकशी सुरु...
- ९.३०- सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३२ टक्के मतदान
- ८.०० - राजगुरुनगर येथील थिगळस्थळ प्राथमिक शाळेत ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड, मशिन रिसेट न झाल्याने बिघाड. दुरुस्तीचे काम सुरू.
- ७.०० - शिरुर लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात.
शिरूर लोकसभा मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या २१ लाख ७३ हजार ४२४ एवढी आहे. तर, मतदान केंद्रांची संख्या २२९६ एवढी आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात गेल्यावेळी ५९.७ टक्के मतदान झाले होते. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. या मतदारसंघात राष्ट्रावादी विरुद्ध शिवसेना उमेदवरांमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी कडून डॉ. अमोल कोल्हे तर शिवसेनेकडून शिवाजीराव आढळराव पाटील मैदानात आहेत.
शिरूर लोकसभा मतदारसंघात जुन्नर विधानसभा मतदारसंघात २ लाख ९८ हजार ८४८, आंबेगाव विधानसभा मतदारसंघात २ लाख ८० हजार ३३४, खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात ३ लाख २३ हजार ५१, शिरूर विधानसभा मतदारसंघात ३ लाख ६९ हजार ८१२, भोसरी विधानसभा मतदारसंघात ४ लाख १३ हजार ६८० तर हडपसर विधानसभा मतदारसंघात ४ लाख ८७ हजार ६९९ एवढे मतदार आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघात हडपसर विधानसभा मतदारसंघ हा सर्वात जास्त मतदार असणारा विधानसभा मतदारसंघ आहे. तर आंबेगाव विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदार आहेत.