पुणे - अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली पुणे महापालिका निवडणुकीकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागून आहे. एकीकडे सत्ताधारी भाजपा पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे तर, राष्ट्रवादी काँग्रेसने देखील भाजपला चितपट करणार असल्याचे सांगितले आहे. या निवणुकीसाठी भारतीय शेतकरी कामगार पक्षाने ( Shetkari Kamgar Paksha will contest pune mnc election ) देखील तयारी सुरू केली आहे. पक्ष येणाऱ्या निवडणुकीत ११० जागा लढणार असल्याचे शेतकरी कामगार पक्षाने आज पत्रकार परिषद घेत स्पष्ट केले.
हेही वाचा - Omkareshwar Temple In Pune : पुण्यातील हे तब्बल 286 वर्ष जुने ओंकारेश्वर मंदिर; वाचा काय आहेत इतिहास
आम्ही राज्यातील एक जबाबदार पक्ष म्हणून पुणे महापालिका निवडुकीसाठी अतिशय संवेदनशील आहोत, असे सांगत आमच्या पक्षाची ताकद जरी कमी वाटत असली तरी, आमचा विश्वास या सर्व प्रस्थापित पक्षांपेक्षा मोठा असल्याचे शेकापच्या नेत्यांनी सांगितले. त्याचबरोबर, पुण्यात एकूण २७ संघटना असून आम्ही सर्वांशी बोलत आहोत. कुठल्याही पक्षाशी युती न करता शेकाप या संघटनांसोबत निवडणुकीला सामोरे जात ११० जागा लढवणार असल्याचे देखील या पत्रकार परिषदेत सांगितले.
हेही वाचा - VIDEO : समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नव्हतेच - श्रीपाल सबनीस