ETV Bharat / city

'नरेंद्र मोदी झोपेतही शरद पवार म्हणूनच बडबडतील'

सरकारचे शेतकऱ्यांबाबतचे धोरण चुकीचे असल्याचा आरोपही पवारांनी केला.  शेतमालाला अडीचपट किंमती वाढून देतो,  असे भाजपने आश्वासन दिले होते.  मात्र त्याची पूर्तता सरकारने केली नाही.

शरद पवार
author img

By

Published : Apr 20, 2019, 9:45 PM IST

पुणे - सद्यस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत एकच विषय असतो, तो म्हणजे शरद पवार! मला काळजी वाटते, की कदाचित मोदी झोपेतही शरद पवार म्हणूनच बडबडतील , अशी बोचरी टीका शरद पवार यांनी मोदींवर केली आहे. ते दौंड येथे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील सभेत शरद पवारांवर सातत्याने टीका करत आहेत. याला प्रत्युत्तर देत शरद पवारांनी दौंड येथील सभेत मोदींवर सडकून टीका केली. ते म्हणाले, सत्ताधारी लोक आम्हाला विचारतात, गेल्या सत्तर वर्षात तुम्ही काय केले ? परंतु गेली पाच वर्षे नरेंद्र मोदींची सत्ता आहे, यापूर्वी अटलजींची सत्ता होती, अशी दहा वर्षे भाजप व मित्रपक्षांची सत्ता देशावर राहिलेली आहे. आता या लोकांना विचारण्याची वेळ आली आहे. दहा वर्षाच्या काळात तुम्ही काय दिवे लावले, असे शरद पवार यावेळी म्हणाले.

शरद पवार दौंडमधील सभेत बोलताना

शेतकऱ्यांबाबतचे धोरण चुकीचे

या सरकारचे शेतकऱ्यांबाबतचे धोरण चुकीचे असल्याचा आरोपही पवारांनी केला. शेतमालाला अडीचपट किंमती वाढून देतो, असे भाजपने आश्वासन दिले होते. मात्र त्याची पूर्तता सरकारने केली नाही. देशामध्ये शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे कर्ज वाढले आहे. मोदी सरकारच्या काळात तब्बल ११ हजार ९९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

भाजपचा समाचार घेताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, सध्या भाजपचे अनेक नेते आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बारामतीत येऊन ठाण मांडावे लागले आहे. यातच आमचे यश आहे. भाजपचे लोक बारामतीत येऊन आम्ही ६० वर्षात काय केले हे विचारतात. तेच लोक काँग्रेस-राष्ट्रवादीने काढलेल्या शाळांमधूनच साक्षर झाले आहेत. या लोकांनी लक्षात घ्यावे शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी जे केले ते कोणीच केले नाही. शरद पवारांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ७१ हजार कोटींची कर्जमाफी दिली होती, असेही खासदार सुळे यावेळी म्हणाल्या.

Intro:mh pune 03 20 pawar on modi av 7201348Body:mh pune 03 20 pawar on modi av 7201348

anchor
सद्यस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत एकच विषय असतो तो म्हणजे शरद पवार मला काळजी वाटते की कदाचित नरेंद्र मोदी हे झोपेत सुद्धा शरद पवार म्हणून चावळतील अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केली बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी दौंड येथे झालेल्या प्रचार सभेत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले, सत्ताधारी लोक आम्हाला विचारतात गेल्या सत्तर वर्षात तुम्ही काय केले,परंतु गेली पाच वर्षे नरेंद्र मोदींची सत्ता आहे आणि मागील काळात अटल बिहारी यांच्या काळातील पाच वर्षे अशी दहा वर्षे भाजपा व मित्रपक्षांची सत्ता देशावर राहिलेली आहे आता वेळ आली आहे या लोकांना विचारण्याची की दहा वर्षाच्या काळात तुम्ही काय दिवे लावले ते सांगा असे शरद पवार यावेळी म्हणाले. या सरकारचे
शेतकऱ्यांबाबतचे धोरण चुकीचे आहे. शेतीमालाला अडीच पट किंमती वाढून देतो असे सांगितले होते मात्र त्याची पूर्तता केली नाही. देशामध्ये शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे कर्ज वाढले असून मोदी सरकारच्या काळात तब्बल ११ हजार ९९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. सध्या भारतीय जनता पार्टी चे अनेक नेते , राज्याचे मुख्यमंत्री यांना बारामतीत येऊन ठाण मांडावे लागले आहे यातच आमचे यश आहे. भाजपाचे लोक बारामतीत येऊन आम्ही ६० वर्षात काय केलं हे विचारतात , या लोकांनी लक्षात घ्यावे शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी जे केलं ते कोणीच केलं नाही . महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 71 हजार कोटींची कर्जमाफी दिली .
जे लोक काँग्रेस - राष्ट्रवादी ने 60 वर्षात काय केलं विचारतात ना , त्या लोकांनी लक्षात घ्यावे तुम्ही जे शिक्षण घेऊन साक्षर झाला , लिहायला वाचायला शिकला ते शाळा - कॉलेज काँग्रेस- राष्ट्रवादी ने काढली आहेत असे त्या म्हणाल्या......Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.