पुणे - मांजरी येथील 'वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट'मध्ये शुक्रवारपासून तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय साखर परिषदेला सुरुवात झाली. या परिषदेचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील, मंत्री सतेज पाटील, हर्षवर्धन पाटील, पंजाबचे सहकारमंत्री सुखविंदर सिंग रधवा उपस्थित होते.
हेही वाचा... ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना; केंद्र करणार 25 लाख कोटींची तरतूद
या साखर परिषदेसाठी २१ देशातील सुमारे दोन हजार उद्योजक शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ सहभागी होणार आहेत. परिषदेला देशभरातील शास्त्रज्ञांच्या १६५ संशोधन लेखाचे सादरीकरण होणार आहे. तसेच साखर व पूरक उद्योगातील विविध विषयांतील अद्ययावत तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा... बॅंक कर्मचाऱ्यांचा संप: आझाद मैदानात सभा
साखर उद्योगातील अभियांत्रिकी प्रक्रिया,अत्याधुनिक अवजारे, बियाणे, यंत्रे आणि साखर कारखान्याच्या २२५ स्टॉलची उभारणी या परिषदेनिमित्त करण्यात आली आहे. यावेळी शरद पवार यांनी परिषदेला मार्गदर्शन केले. 'शाश्वत विकास साधण्यासाठी साखर उद्योगाचा विस्तार केला पाहीजे. त्यासाठी वसंतदाद शुगर इन्स्टिट्युट संस्था काम करत आहे. वसंतदादा पाटील यांनी अशा प्रकारची संस्था शेतकऱ्यांसाठी सुरू केली. याचा फायदा साखर उद्योग व शेतकरी यांना होतो आहे. मात्र, आता जगामध्ये साखर उत्पादक, ग्राहक यांच्यात संवाद होणे गरजेचे आहे. यामध्ये संशोधन करणाऱ्यांना मदत करणेही गरजेचे असल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले. तसेच नवीन संशोधनासाठी या परिषदेचा फायदा होईल, अन्नधान्याची गरज वाढते आहे. त्यात उसाची शेती वाढवणे शक्य नाही त्यामुळे दुसरे पर्याय शोधणे आवश्यक असून वातावरणातील बदलामुळे जो बदल होतो आहे, त्याचाबद्दल संशोधन होणे गरजेचे असल्याचे पवारांनी सांगितले.
हेही वाचा... संतापजनक..! जालन्यात प्रेमी युगुलाला मारहाण, विनयभंग झाल्याने तरुणीने घेतले विष