पुणे - पुणे शहरातील देशना नहारने वयाच्या सातव्या वर्षी 'लिंबो स्केटिंग' ( Limbo Skating ) या अत्यंत अवघड 'स्केटिंग' प्रकारामध्ये जागतिक रेकॉर्ड केले आहे. केवळ 13.74 सेकंदांमध्ये 20 चारचाकी गाड्यांखालून स्केटिंग पूर्ण करीत तिने गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव कोरले. तिने 2015 मध्ये चीनमधील एका मुलीने केलेला विश्वविक्रम मोडला आहे.
तिसऱ्या वर्गात घेत आहे शिक्षण - देशनाने 16 एप्रिलला तब्बल 20 चारचाकी गाड्यांखालून 13.74 सेकंदात स्केटिंग पूर्ण केले होते. आणि 14 जून रोजी गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तिची नोंद झाली. तिला पुणे येथील प्रशिक्षक विजय मलजी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. ती हचींग स्कूलमध्ये इयत्ता तिसरीमध्ये शिक्षण घेत आहे. तिच्या या नव्या कर्तृत्वासाठी तिची आजी दया नहार यांनीही अथक परिश्रम घेतले. या कामगिरीसाठी तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
चीनच्या 14 वर्षीय मुलीचा मोडला रेकॉर्ड - देशनाला वयाच्या पाचव्या वर्षापासून स्केटिंगची आवड होती. तिने गेली दोन वर्ष रॉक ऑन व्हील्स स्केटिंग अकॅडमीमध्ये ती प्रशिक्षण घेत असून अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. या स्पर्धांचा अनुभव पाठीशी घेऊन तिने जागतिक विक्रम करत राज्यातील प्रत्येकाची मान अभिमानाने उंचावली आहे. विशेष म्हणजे हा रेकॉर्ड करताना तिने 2015 साली चीनमधील एका 14 मुलीने जो रेकॉर्ड केला होता, तो मोडला आहे.
अशी घालवली मनातील भिती - आज हे जे काही रेकॉर्ड झाला आहे. याचा मला खूप आनंद होत आहे. सुरुवातीला मनात खूप भीती होती की 20 गाड्यांच्या खालून जायचे आहे. पण जसे जशी प्रॅक्टिस करत होते, तसतसे ही भीती दूर झाली आणि आज गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याने खूप आनंद होत असल्याची भावना यावेळी देशनाने व्यक्त केल्या.
वडिलांना व्यक्त केला आनंद - आज देशनाने जो रेकॉर्ड केला आहे. त्याचा एक वडील म्हणून मला खूप आनंद होत आहे. जेव्हा कोचने वर्ल्ड रेकॉर्डच सांगितले आणि सांगितल की गाड्यांच्या खालून हे रेकॉर्ड करायचं आहे. तेव्हा मी पण राजी झालो नव्हतो पण तिची प्रॅक्टिस बघून मला विश्वास आला आणि आज तिने हा रेकॉर्ड केला आहे. याचा खूप आनंद होत आहे असे तिचे वडील आदित्य नहार यांनी सांगितले.
हेही वाचा - 44th Chess Olympiad : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले जगातील सर्वात मोठ्या बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन