पुणे - देशात जर कोरोनाची चौथी लाट ( fourth wave of corona ) आली, तर ती सौम्य असेल. शिवाय प्रवाशांना बुस्टर डोसची आवश्यकता ( Booster Dose Required ) आल्याची माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला ( Adar Poonawalla CEO Serum Institute of India ) यांनी आज (सोमवारी) पुण्यात बोलताना दिली आहे. बूस्टर डोसबद्दल आम्ही काही महिन्यांपासून सरकारला आवाहन केले आहे. कारण प्रवास करणार्या प्रत्येकाला बूस्टर डोस घेणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकारशी चर्चा करत असल्याचेही पूनावाला यांनी म्हटले आहे. सोबतच सरकारकडून लवकरच बूस्टर धोरणाची घोषणा येत्या काही दिवसांत केली जाईल, अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.
केंद्र सरकारची स्तुती : आतापर्यंत केंद्र सरकारने विलक्षण काम केले आहे. केंद्रातील मोदी सरकारने आधीच संपूर्ण प्रौढ लोकसंख्येला दोन डोस देऊन कव्हर केले आहे आणि आता बूस्टरची वेळ देखील आली आहे. याबाबत सीरमने आधीच आवाहन केले असून खात्री आहे की सरकार सकारात्मक निर्णय घेईल, अशी आशा देखील पूनावाला यांनी व्यक्त केली आहे.
'कोरोनाची चौथी लाट सौम्य असेल' : जर देशात कोरोनाची जर चौथी लाट आली तर ती सोम्य असेल, त्याचबरोबर मला याबाबत कुठलेही भाकीत करायचे नाही. परंतु आपण नवीन उत्परिवर्ती प्रकारांना आपल्या देशाने कसा प्रतिसाद दिला आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. त्याचबरोबर आपल्या देशातील लसी इतर देशांच्या लसींपेक्षा कितीतरी पटीने चांगल्या सिद्ध झाल्या आहेत, अस समाधानही त्यांनी व्यक्त केले आहे. लसींचा पुरेसा साठा आहे आणि कोणतीही कमतरता भासणार नाही, असे आश्वासित देखील केले आहे.