ETV Bharat / city

Pune Congress City President : अरविंद शिंदे यांची प्रभारी पुणे काँग्रेस शहर अध्यक्ष म्हणून निवड - प्रभारी पुणे काँग्रेस शहर अध्यक्ष कोण

पुणे शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी ( Pune Congress City President ) माजी नगरसेवक अरविंद शिंदे ( Arvind Shinde ) यांची प्रभारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. रमेश बागवे यांनी ( Ramesh Wagave Resign ) अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच शिंदे यांच्या नावावर शिक्का मोर्तब करण्यात आले आहे.

Pune Congress City President
Pune Congress City President
author img

By

Published : Jun 10, 2022, 5:07 PM IST

Updated : Jun 10, 2022, 5:33 PM IST

पुणे - पुणे शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी ( Pune Congress City President ) माजी नगरसेवक अरविंद शिंदे ( Arvind Shinde ) यांची प्रभारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. रमेश बागवे यांनी ( Ramesh Wagave Resign ) अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच शिंदे यांच्या नावावर शिक्का मोर्तब करण्यात आले असून, आता महापालिका निवडणूका त्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहेत. आज शिंदे यांनी काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला आहे.

प्रतिक्रिया

पुणे शहर काँग्रेस पक्षात गेल्या काही वर्षापासून उघडपणे पक्षातील नेत्यांनी जाहीर नाराजगी दाखवली आहे. याच अंतर्गत गटबाजीचा फटका काँग्रेसला बसला आहे. यावर शिंदे यांना विचारलं असता ते म्हणाले की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना आत्ता हे कळाल आहे की, अंतर्गत गटबाजीचा फटका हा कसा बसतो. त्यामुळे येणाऱ्या काळात कुठेही काँग्रेसला गटबाजी दिसणार नाही. आम्ही सर्व एकदिलाने काम करू, असे यावेळी शिंदे यांनी सांगितले.

काँग्रेसने पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेल्या पदाधिकाऱ्यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जवळपास सहा वर्ष शहराध्यक्ष पदावर असलेल्या बागवे यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी अनेक इच्छुक होती. यातील शिंदे यांची आत्ता प्रभारी म्हणून निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अरविंद शिंदे यांच्या अध्यक्षपदाच्या नावावर शिक्कामोर्तब केले. शिंदे यांनी महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेता आणि काँग्रेस गटनेता अशा पदांवर काम केले आहे. याचा फायदा येणाऱ्या काळात पक्षासाठी कसा होईल, यासाठी काम करणार असून येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस चमत्कारी आकडा गाठेल, असं देखील यावेळी शिंदे म्हणाले.

हेही वाचा - Salman Khan Threat Letter : सौरभ महाकालने सलमान खान धमकी पत्राबाबत चौकशीत दिली 'ही' माहिती

Last Updated : Jun 10, 2022, 5:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.