पुणे - नवीन शैक्षणिक वर्ष सोमवारपासून सुरू झाले असले तरी शहरातील प्रत्यक्ष शाळांची घंटा आज (दि. 15 जून) वाजली आहे. पुणे शहरातील प्राथमिक शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात चॉकलेट्स आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षे ऑनलाइन पद्धतीने शाळा सुरू होती. पण, यंदाच्या या नव्या शैक्षणिक वर्षात कोरोनाच प्रादुर्भाव कमी झाल्याने ऑफलाइन पद्धतीने शाळा सुरू झाली आहे. पुण्यातील राजीव गांधी ई - लर्निग स्कूलमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी विदुषकाचा प्रयोग करुन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले तसेच त्यांना यावेळी गुलाब पुष्प, चॉकलेट्सही देण्यात आले. यावेळी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह दिसून आला.
सोमवारपासून सुरू झालेल्या शाळांमध्ये स्वच्छता आणि विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्याच्या हेतूने शाळांमध्ये मुलांना बुधवारपासून दाखल करून घ्यावे, असे आदेश शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले होते. त्यानुसार आज शहरातील बहुतांश शाळांनी मुलाचे स्वागत केले आहे.
गेली दोन वर्षे ऑनलाइन पद्धतीने शाळा शिकत होतो.पण, यंदाच्या या शैक्षणिक वर्षात ऑफलाइन पद्धतीने शाळा सुरू होत असल्याने आनंद होत आहे. शाळा कधी सुरू होईल याची आम्ही वाट बघत होतो. मित्र मंडळी भेटले असून अनेक नवीन मित्र मिळणार असल्याचे आनंद आम्हाला होत आहे. आज शाळा सुरू झाल्याने आम्हाला खूप आनंद होत असल्याची भावना काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - Firing on Merchant in Pune : पुण्यातील फॅशनस्ट्रिट परिसरात गोळीबार, व्यापारी जखमी