ETV Bharat / city

Schools in Pune - कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळा १५ डिसेंबरपर्यंत बंद - Pune Schools close Mayor Muralidhar Mohol

पुणे शहरात काल महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे मनपा हद्दीतील पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा ( Schools in Pune ) १५ डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल त्यांनी ट्विटरवरून माहिती दिली.

students
विद्यार्थी
author img

By

Published : Dec 1, 2021, 2:33 AM IST

पुणे - राज्य सरकारने एक डिसेंबरला पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक जिल्ह्यात शाळा सुरू करण्याच्या तयारीलाही सुरुवात झाली आहे, मात्र मुंबई महापालिकेने कोरोनाच्या नव्या प्रकाराचा धोका पाहता शाळा १ तारखेपासून सुरू होणार नसल्याचे जाहीर केले. पुणे शहरातही काल महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे मनपा हद्दीतील पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा ( Schools in Pune ) १५ डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल त्यांनी ट्विटरवरून माहिती दिली.

माहिती देताना महापौर मुरलीधर मोहोळ

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी बेमुदत उपोषण - सशांक राव

मोहोळ म्हणाले, कोरोनाच्या नव्या व्हेरियंटी धास्ती संपूर्ण जगाने घेतली आहे. ऑस्ट्रिया, जर्मनी सारख्या शहरांत लॉकडाऊन करण्यात आला आहे. पुणे शहरात लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले असले तरी, लहान मुलांचे लसीकरण झालेले नाही. त्यामुळे, १५ डिसेंबरपर्यंत पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. पंधरा डिसेंबरनंतर पालक संघटना, प्राचार्य, शिक्षक आणि टास्क फोर्स यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल.

स्थानिक प्रशासन निर्णय घेत आहे

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिकॉन विषाणू आढळून आला आहे. विदेशात ओमिक्रॉन विषाणूचा फैलाव वेगाने होत आहे. परदेशात ओमिक्रॉनचा संसर्ग फोफावला आहे. राज्य सरकारने याची धास्ती घेत, उपाययोजना हाती घेतल्या आहेत. 1 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या शाळांबाबत तेथील स्थानिक प्रशासन निर्णय घेत आहे. दरम्यान काही ठिकाणी 1 डिसेंबर पासून शाळा सुरू होत आहेत, तर काही ठिकाणी 10 डिसेंबर ते 15 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनांनी घेतला आहे.

शाळा कुठे बंद कुठे सुरू?

अमरावतीत 1 डिसेंबरपासून शाळा सुरू होणार

कोरोनामुळे तब्बल दीड वर्ष बंद असणाऱ्या प्राथमिक शाळांमध्ये बुधवारपासून चिमुकल्यांचा किलबिलाट ऐकायला मिळणार आहे. राज्य शासनाने 1 डिसेंबरपासून राज्यातील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक दिवसांपासून ओस पडलेल्या अमरावती जिल्ह्यातील शाळांमध्ये ( Amravati district Primary school ) चिमुकल्यांच्या स्वागतासाठी शिक्षक सज्ज झाले आहेत.

१ डिसेंबरला औरंगाबादेतील शाळेची घंटा वाजणार नाही

राज्यात प्राथमिक शाळा ( Primary School Reopen ) 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र कोरोनाचा नवा व्हेरिएंट ( Corona new Omicron Variant ) येण्याची शक्यता पाहता, औरंगाबाद महानगरपालिकेच्या ( Aurangabad Municipal Corporation ) हद्दीतील शाळा 10 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 5 डिसेंबर रोजी याबाबत पुढील आढावा बैठक घेऊन त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

हेही वाचा - Pune Film Festival - पिफ 2021 ची घोषणा, अभिनेते अशोक सराफ यांना मिळणार 'पिफ डिस्टिंग्विश्ड अॅवॉर्ड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.