पुणे - करोनाच्या प्रादुर्भावामुळे ( Corona -19 ) निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ( Higher and Technical Education Department ) करोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण शुल्क माफ ( Student fee waived ) करण्याचा निर्णय घेतला होता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ( Savitribai Phule Pune University ) शुल्कमाफीसंदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध करूनही महाविद्यालयांनी शुल्कमाफीची अंमलबजावणी केली नसल्याच्या तक्रारी विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली होती. त्यावर सावित्रीबाई फुलेविद्यापीठाकडून पुन्हा नव्याने परिपत्रकाद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.
विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार करोनामुळे पालक गमावलेल्या आणि शुल्कमाफी न मिळालेल्या विद्यार्थ्यांची विद्यार्थी यादी संघटनांकडून विद्यापीठाकडे पाठवली आहे. महाविद्यालयांचे प्राचार्य, संचालक यांनी संबंधित विद्यार्थ्यांची शुल्कांसंदर्भातील अहवाल ३१ जुलैपर्यंत पाठवण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्याची मागणी स्टुडन्ट हेल्पिंग हँडचे कुलदीप आंबेकर यांनी केली आहे.
हेही वाचा - क्रूरतेचा कळस.. ६ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या.. चाकूने डोळे फोडून, जीभ कापली..