ETV Bharat / city

इंधन दरवाढीमुळे ईलेक्ट्रीक वाहनांची विक्री वाढली! दिवाळीत पु्ण्यात ई-बाईक्स विक्रीचा उच्चांक! - Sales of electric vehicles increase due to fuel price hike!

ग्राहकांचा पेट्रोल बाईक किंवा स्कूटरऐवजी इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. हा कल यंदाच्या दिवाळीतही पाहायला मिळाला. पिंपरी-चिंचवड आणि पुणेकरांनी यंदा दिवाळीत 710 ई-बाईक खरेदी केल्या आहेत.

इंधन दरवाढीमुळे ईलेक्ट्रीक वाहनांची विक्री वाढली! दिवाळीत पु्ण्यात ई-बाईक्स विक्रीचा उच्चांक!

author img

By

Published : Nov 9, 2021, 3:57 PM IST

पुणे : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सतत वाढ होत असल्याने सध्या एक नवीन ट्रेंड बघायला मिळतोय. आता ग्राहकांचा पेट्रोल बाईक किंवा स्कूटरऐवजी इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. हा कल यंदाच्या दिवाळीतही पाहायला मिळाला. पिंपरी-चिंचवड आणि पुणेकरांनी यंदा दिवाळीत 710 ई-बाईक खरेदी केल्या आहेत.

पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये 12 हजार वाहनांची विक्री
यंदा दिवाळीनिमित्त विविध वस्तू खरेदीवर कोट्यवधींची उलाढाल झाली. यात दुचाकी तसेच चारचाकी वाहन खरेदीचे प्रमाणही अधिक होते. पाडव्याचा मुहूर्त साधत पुणेकरांनी यंदा तब्बल ७ हजार ७६९ तर पिंपरी- चिचवडकरांनी ४ हजार ६६९ वाहनांची खरेदी केली. यात यंदा सर्वाधिक दुचाकी वाहनांची खरेदी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्याकडे यंदा पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी केलेल्या वाहनांची नोंद करण्यात आली आहे. त्या नोंदीनुसार यंदाची वाहन खरेदीची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पुण्यातून ७ हजार ७६९ वाहनांची विक्री
यात यंदा २७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत पुणे आरटीओत एकूण ७ हजार ७६९ वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक ४ हजार ८७३ दुचाकी तर, २ हजार ३६५ चारचाकी वाहनांचा समावेश असून उर्वरित इतर वाहने आहेत.

विक्रीतून २५ कोटी ८५ लाखांचा महसूल
तसेच, पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयात ४ हजार ६६९ वाहनांची नोंदणी झाली. यामध्ये सर्वाधिक २ हजार ८०७ दुचाकी तर, १ हजार ४७६ चारचाकी वाहनांचा समावेश असून इतर उर्वरित वाहने आहेत. यातून पुणे आणि पिंपरी चिंचवड आरटीओला अनुक्रमे ४५ कोटी ४८ लाख आणि २५ कोटी ८५ लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे.

ई-बाईकची विक्रीची आकडेवारी
पुणे ४३३
पिंपरी २७७
एकूण ७१०

ई वाहन धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पुणे महापालिकेची स्वतंत्र पॉलिसी
राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाने इलेक्ट्रीकवर चालणार्‍या वाहनांसाठी स्वतंत्र धोरण तयार केले असून त्याची अंमलबजावणी करण्याची घोषणाही केली आहे. या धोरणाची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने स्वतंत्र धोरण तयार करण्यास सुरूवात केली आहे. पर्यावरणपूरक ईलेक्ट्रीकल वाहनांचा वापर वाढविण्यासाठी राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार पुणे महापालिका धोरण तयार करत आहे. या धोरणात महापालिकेच्या वाहनतळांवरही चारचाकी व दुचाकी चार्जिंगची सुविधा उपलब्ध करणे, महापालिकेच्या सर्व इमारतींच्या पार्किंगमध्ये चार्जिंगची व्यवस्था करणे, यासाठी दर व संचलनाची कार्यपद्धती निश्‍चित करणे, चार्जिंग स्टेशनच्या ठिकाणची सुरक्षितता आदींचा विचार धोरणात करण्यात येणार आहे.

शहरात ५०० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार
ग्रीन पुणे ‘इलेक्ट्रिक बाईक रेंटींग प्रोजेक्ट’ अंतर्गत व्हि-ट्रो मोटर्स प्रा.लि. या कंपनीला शहरात भाडेतत्वावर ई-बाईक्स आणि ५०० चार्जींग स्टेशन उभारण्याची परवानगी देण्याच्या प्रस्तवाला शहर सुधारणा समितीने मंजुरी दिला आहे. या कंपनीने पहिल्या टप्प्यात विविध ठिकाणी ५०० ई बाईक्स भाड्याने देण्यासाठी तसेच ५०० ठिकाणी चार्जींग स्टेशन उभारणार आहे. या ई-बाईकसाठी प्रत्येक कि.मी.ला ४ रुपये भाडेदर राहाणार असून एका दिवसासाठी १५० कि.मी.ला ४५० रुपये, आठवड्यासाठी एक हजार कि.मी.ला १९०० रुपये तर महिनाभरासाठी ४ हजार कि.मी.साठी ३८०० रुपये दर आकारला जाणार आहे. शहराच्या विविध भागात एका ठिकाणी १० ई बाईक्स उभ्या करण्यात येतील. तसेच विविध ५०० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.