पुणे - प्रसिद्ध बालसाहित्यकार आणि कवयित्री डॉ. संगीता बर्वे यांच्या पियूची वही या पुस्तकास साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य अकादमीच्या वतीने बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. Sahitya Akademi Award यामध्ये प्रसिद्ध बालसाहित्यकार आणि कवयित्री डॉ. संगीता बर्वे यांच्या वरील पुस्तकाचा समावेश आहे. देशातील २२ भाषांमधील बालसाहित्यकारांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
दैनंदिनी लिहिण्यास सुरूवात केली गेली तीस वर्षे मी मुलांमध्ये काम करते आहे. बाल साहित्याचा दर्जा दुय्यम आहे, अशा टीकेकडे दुर्लक्ष करत मी हे काम करत आले आहे. साहित्य अकादमीच्या पुरस्काराच्या निमित्ताने आपल्या कामाची दखल घेतली आहे याचे समाधान आहे. Sahitya Akademi Award announced मुलांनी दैनंदिनी लिहावी, या उद्देशाने पियूची वही हे पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे अनेक मुलांनी दैनंदिनी लिहिण्यास सुरूवात केली आहे. या पुरस्कारामुळे हे पुस्तक अधिक मुलांपर्यंत पोहोचून ते देखील दैनंदिनी लिहण्यास सुरूवात करतील, अशी आशा आहे, अशी भावना डॉ. बर्वे यांनी व्यक्त केली आहे.
विविध पुरस्कारांनी सन्मान डॉ. बर्वे या आयुर्वेद शास्त्राच्या पदवीधर असून गेली अनेक वर्षे बाल साहित्याच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचे मृगतृष्णा, दिवसाच्या वाटेवरुन, अंतरीच्या गर्भी, हे कवितासंग्रह आणि गंमत झाली भारी, उजेडाचा गाव, रानफुले, झाड आजोबा, खारूताई आणि सावलीबाई, मिनूचे मनोगत, भोपळ्याचे बी, नलदमयंती आणि इतर कथा आदी बालसाहित्य प्रकाशित आहे. त्यांना राज्य सरकारचा कवीवर्य भा. रा. तांबे आणि साने गुरुजी पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ग. ह. पाटील पुरस्कार, कवयित्री इंदिरा संत योजनेंतर्गत उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
बालकुमार साहित्य संस्थेच्या अध्यक्ष म्हणून कार्यरत रोजनिशी लिहीण्यासाठी रोज काहीतरी लिहिण्यासारखे केले पाहिजे या प्रेरणेतून पीयू नावाच्या मुलीला निसर्गातील वेगवेगळया गोष्टींची होणारी ओळख हे पियूची वही या कादंबरीचा विषय आहे. पीयू नावाची एक छोटी मुलगी रोजनिशी लिहिण्यासाठी काहीतरी केले पाहिजे म्हणून सुटीच्या दिवशी खिडकी रंगवायला घेते. त्यातून तिला तिचे जग आणि निसर्ग सापडतो. निसर्ग आणि निसर्गातील विविध घटकांच्या ओढीने पीयू आपले अनुभव लिहू लागली. बालसाहित्यातील प्रदीर्घ योगदानाची दखल घेऊन २०१५ साली २६ व्या अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. बर्वे यांची सन्मानाने निवड करण्यात आली होती. सध्या त्या अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
परिक्षक मंडळ भारत सासणे, प्रवीण बानदेकर आणि प्रेमानंद गजवी या साहित्यिकांचा मराठी भाषेतील साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार निवडीच्या परिक्षक मंडळात समावेश होता. ५० हजार रुपये आणि ताम्रपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून यावर्षी १४ नोव्हेंबर २०२२ या बालदिनी साहित्य अकादमीच्या विशेष कार्यक्रमात या पुस्काराचे वितरण करण्यात येईल. या पुरस्कारांमध्ये कोकणी भाषेसाठी लेखिका ज्योती कुंकळकर यांच्या मयुरी या कादंबरीस बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
हेही वाचा - दिल्लीतील आरएमएल रुग्णालयात करण्यात आले हृदय प्रत्यारोपणाचे पहिले यशस्वी ऑपरेशन