पुणे - सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या अरण्येश्वर येथील विवेकानंद सोसायटीत सुरू असणाऱ्या बांधकाम ठिकाणावरून 1 लाख 2 हजार 750 रुपयांचे प्लम्बिंगचे साहित्य चोरीला गेले होते. त्या आरोपीला सहकार नगर पोलिसांनी चोवीस तासाच्या आत अटक केली. सोमनाथ कालिदास पवार असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून यासंदर्भात एका अज्ञात व्यक्तीने तक्रार दिली होती.
गुन्ह्यातील प्लम्बिंगच्या वस्तु आण्णाभाऊ साठे वसाहत अरण्येश्वर पुणे येथे राहणाऱ्या सोमनाथ पवार याने चोरल्या. त्या वस्तु विकण्यासाठी गिऱ्हाईकाच्या शोधात तो होता. ही माहिती पोलीस अंमलदार भुजंग इंगळे, सुशांत फरांदे व महेश मंडलीक यांना मिळाली. त्यानुसार तपास पथकाचे प्रभारी अधिकारी समीर शेंडे व तपास पथक स्टाफने आण्णाभाऊ साठे वसाहत अरण्येश्वर पुणे येथे सापळा रचून त्याला अटक केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मारुती वाघमारे करीत आहेत.
हेही वाचा - Ketaki Chitale : अभिनेत्री केतकी चितळेच्या अटकेची शक्यता.. शरद पवारांवरील 'पोस्ट'वरून गुन्हा दाखल