पुणे - राज्यात सद्या अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही विकृत मनोवृत्ती आहे, अशी प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर ( Rupali Chakankar Criticized Navneet Rana ) यांनी दिली आहे. खासदार नवनीत राणा हे केंद्रात प्रतिनिधित्व करतात. जेंव्हा महाराष्ट्र अडचणीत होता, तेंव्हा त्यांनी महाराष्ट्रासाठी केंद्राकडे मदत का मागितली नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
'वाद कसा निर्माण होईल याकडे लक्ष' - अपक्ष खासदार नवनीत राणा या राज्यतील ठाकरे सरकार विरोधात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार करणार आहे. यावर राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, 'कोरोनाच्या महामारीतून आत्ताच महाराष्ट्र बाहेर आला आहे. महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्था, शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्न,असे खूप मोठे प्रश्न राज्याच्या समोर आहे. यावर न बोलता, या राज्यता वाद कसा निर्माण होईल याकडे काहींचा लक्ष आहे.'
गणेश नाईक विरोधात पीडितेने राज्य महिला आयोगाकडे ऑनलाईन तक्रार दाखल केली होती. त्यानंतर प्रत्यक्ष भेटून त्याने सगळा प्रकारदेखील सांगितला होता. याबाबत राज्य महिला आयोगाने नवी मुंबई आणि नेरुळ पोलीस स्टेशनमध्ये कारवाई बाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर नाईक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनंतर त्यांना सत्र न्यायालयात जामीन मिळाला नाही, तर उच्च न्यायालयात जामीन मिळाला आणि त्यानंतर देखील पीडितेने महिला आयोगाकडे भेट दिली. आता पोलीस जो काही तपास करत आहे, त्यावर महिला आयोगाचे लक्ष लागून आहे. आणि निश्चितच तो तपास निःपक्षपाती होणार आहे, अस देखील यावेळी चाकणकर म्हणाल्या.
हेही वाचा - Cyclone Asani: 'असानी' चक्रीवादळ 24 तासांत ओडिशा किनारपट्टीवर धडकणार; वाचा कोणत्या दिशेने जाणार वादळ