पुणे - राज्य सरकारच्या विरोधात राज्यभरात आजपासून विविध मागण्याकरता रिपब्लिकन पक्षाच्यावतीने (आरपीआय) आंदोलन सुरू करण्यात येत आले. पुण्यातही स्टेशन परिसरातील आंबेडकर उद्यानासमोरही आरपीआयकडून आंदोलन करण्यात आले
पुण्यातही स्टेशन परिसरातील आंबेडकर उद्यानासमोरही आरपीआयकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी आरपीआयकडून विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.
हेही वाचा-आरपीआय उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपाशी युती करण्याच्या प्रयत्नात - रामदास आठवले
या आहेत आरपीआयच्या मागण्या-
- ओल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपये राज्य शासनाच्या वतीने मदत देण्यात यावी.
- बलात्कारातील पीडित महिलांना 50 लाख रुपये राज्य सरकारच्यावतीने मदत म्हणून देण्यात यावी.
- अॅट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी.
- ओबीसी समाजाला राज्यामध्ये राजकीय आरक्षण देण्यात यावे.
- महात्मा फुले व आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळास निधी उपलब्ध करून देण्यात यावा.
- रेशनिंगवर देण्यात येत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याची चौकशी करण्यात यावी.
- अनुसूचित जाती-जमातीचा पदोन्नतीतील अनुशेष त्वरित भरण्यात यावा.अशा मागण्याकरता हे आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा-रिपाइं सोबत असताना भाजपाने मनसेच्या नादाला लागू नये - आठवले
'जातीनिहाय जनगणना व्हावी'
जातीनिहाय जनगणना व्हायला हवी, अशी मागणी असल्याचे आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटले आहे. त्यातून जातीभेद वाढणार नाही तर ज्या जाती अधिक मागास आहेत त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणे सोयीचे होणार आहे. दलितांचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. त्यांना आत्मनिर्भर करण्याची आवश्यकता आहे, असेही आठवले म्हणाले होते.