ETV Bharat / city

गरज पडली की पवार साहेबांचा सल्ला अन् नंतर...

सोलापूर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पवारांवर टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून भाजपवर शाब्दिक हल्ला केला आहे.

रोहित पवार
author img

By

Published : Sep 3, 2019, 1:14 PM IST

पुणे - गरज पडली की साहेबांचा सल्ला, गरज पडली की बारामतीत येवून साहेबांच कौतुक करायचं आणि निवडणुकीची वेळ आली की त्यांनीच विचारायचं साहेबांनी काय केलं? अशा शेलक्या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली आहे. सोलापूर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पवारांवर टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून भाजपवर शाब्दिक हल्ला केला आहे.

रोहित पवार पोस्टमध्ये लिहतात, डबल ढोल असतो. जो दोन्हीकडून वाजतो. समोरच्या पक्षाचं राजकारण नेहमीच डबल ढोल असल्यासारखं वाजत असत. पण आत्ता बास झालं. साहेबांच राजकारण म्हणजे कुणीही उठावं आणि बोट दाखवाव असे निश्चितच नाही. गेल्या ५० वर्षात तीन पिढ्यांनी पाहिलेलं हे राजकारण आहे. साहेबांमुळे ज्याने शेतीतून चार पैसै कमावले त्यांच्या मुलाने तालुक्याच्या ठिकाणी चांगले शिक्षण घेवून नोकरी केली आणि त्याचा नातू आज आयटी कंपनीत नोकरी करू शकतो. शेती पासून ते आयटी पार्क उभा करण्यापर्यंतची ही शृंखला आहे.

हेही वाचा - कृष्णा भीमा स्थिरीकरण होणारच; मोदी है तो मुमकीन है, मुख्यमंत्र्यांचा जयंत पाटलांना टोला

महिलांना समान संधी निर्माण करण्यापासून ते उपेक्षित व दिनदुबळ्या लोकांच्या पाठीमागे उभा राहण्याचा हा प्रवास आहे. प्रसंगी राजकारणाची तडजोड न करता साहेबांनी वंचित व अल्पसंख्याक समाजासाठी घेतलेले निर्णय उभा महाराष्ट्र जाणतो. जातीपाती, धर्माधर्मात भांडण लावणारा नाही तर माणसं जोडणारा हा इतिहास आहे.

सामान्य माणूस साहेबांच्या सोबत आहे. तर, घरात आमदारकीपासून खासदारकी आलेले नेतेमंडळी कुंपणावरून उड्या मारण्यात आघाडीवर आहेत. मध्यंतरी पीठ बदलण्याची भाषा आपण केली होती, जाड भरडं पीठ पण दुसऱ्या पक्षात गेलं. आत्ता जमिनच नांगरायची वेळ आलीये. चांगली मशागत करुन ठेवुया. लवकरच ठरवुया, कधी कुठे आणि कशी सुरवात करायची, आवाहन देखील त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

हेही वाचा - ...तर शरद पवार व पृथ्वीराज चव्हाणांशिवाय विरोधात कुणीच शिल्लक राहणार नाही - अमित शाह

गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक बडे नेते पक्ष सोडून सत्ताधारी पक्षात प्रवेश करत आहे. मधुकर पिचड, चित्रा वाघ, शिवेंद्रराजे भोसले, राणा जगजितसिंह पाटील, धनंजय महाडीक, वैभव पिचड, दिलीप सोपल अशा बड्या नेत्यांनी राष्ट्रवादी रामराम करत भाजप-शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे येणारी विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आव्हानात्मक असणार आहे.

Intro:Body:

गरज पडली की साहेबांचा सल्ला, गरज पडली की बारामतीत येवून साहेबांच कौतुक करायचं आणि निवडणुकीची वेळ आली की त्यांनीच विचारायचं साहेबांनी काय केलं?

डबल ढोल असतो. जो दोन्हीकडून वाजतो. समोरच्या पक्षाचं राजकारण नेहमीच डबल ढोल असल्यासारखं वाजत असत.

पण आत्ता बास झालं.

साहेबांच राजकारण म्हणजे कुणीही उठावं आणि बोट दाखवाव अस निश्चितच नाही. गेल्या ५० वर्षात तीन पिढ्यांनी पाहिलेलं हे राजकारण आहे. साहेबांमुळे ज्याने शेतीतून चार पैसै कमावले त्यांच्या मुलाने तालुक्याच्या ठिकाणी चांगले शिक्षण घेवून नोकरी केली आणि त्याचा नातू आज IT कंपनीत नोकरी करु शकतो. शेती पासून ते IT पार्क उभा करण्यापर्यन्तची हि शृंखला आहे.

महिलांना समान संधी निर्माण करण्यापासून ते उपेक्षित व दिनदुबळ्या लोकांच्या पाठीमागे उभा राहण्याचा हा प्रवास आहे. प्रसंगी राजकारणाची तडजोड न करता साहेबांनी वंचित व अल्पसंख्याक समाजासाठी घेतलेले निर्णय उभा महाराष्ट्र जाणतो. जातीपाती, धर्माधर्मात भांडण लावणारा नाही तर माणसं जोडणारा हा इतिहास आहे.

सामान्य माणूस साहेबांच्या सोबत आहे तर घरात आमदारकी पासून खासदारकी आलेले नेतेमंडळी कुंपणावरून उड्या मारण्यात आघाडीवर आहेत. मध्यंतरी पिठ बदलण्याची भाषा आपण केली होती, जाड भरडं पीठ पण दूसऱ्या पक्षात गेलं. आत्ता जमिनच नांगरायची वेळ आलेय. चांगली मशागत करुन ठेवुया.

लवकरच ठरवुया… 

कधी कुठे आणि कशी सुरवात करायची.

पण एक लक्षात असू द्या. महाराष्ट्राच्या मातीत स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी रुजवेलेली विचारांची व विकासांच्या राजकारणाची श्रृखंला थोरामोठ्यांच्या आशिर्वांदाने आपणा तरुणांनाच पुढे घेवून जावी लागणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.