पुणे - गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्य नागरिक पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईचा सामना करत असताना एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचा या दरवाढीमुळे आर्थिक बजेट कोलमडल आहे. मार्च २०२२ मध्येही सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. यावाढीबाबत सर्वसामान्य गृहुणींनीनी संताप व्यक्त केला आहे.
या दरवाढीनंतर घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 999.50 रुपये झाली होती. तसेच मे महिन्यांमधील दरवाढीने आता सिलिंडर गॅसची किंमत 1 हजार 3 रुपयांना झाली आहे. गृहीणींच्या स्वयंपाकाला चांगलीच फोडणी मिळाली आहे. घरगुती गॅसमध्ये झालेल्या वाढीबाबत सर्वसामान्य गृहुणींचं मत जाणून घेतले आहे आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद याने पाहुया काय म्हणाले महिला.