पुणे - महागाईने त्रस्त असलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांना आता आपला खिसा आणखी रिकामा करावा लागणार आहे. कारण आज पासून रिक्षा भाड्यामध्ये वाढ झाली आहे.आता पहिल्या 1.5 किमीसाठी 18 रुपयांऐवजी 21 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यानंतर प्रत्येक किमीसाठी 14 रुपये नागरिकांकडून भाडे स्वीकारले जाईल असे पुणे विभागाच्या आरटीओने (RTO) स्पष्ट केले आहे.
खटुआ समितीच्या शिफारशी नुसार भाडे वाढ
ही दरवाढ आज 22नोव्हेंबरपासून लागू होणार आहे.आरटीएने 14 ऑक्टोबरला रिक्षाची भाडेवाढ जाहीर केली होती. त्यानुसार पहिल्या दीड किलोमीटरच्या टप्प्यासाठी 20 रुपये आणि त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी 13 रुपये मंजूर केले होते. आठ नोव्हेंबरपासून दरवाढ लागू होणार होती. मात्र, ही दरवाढ पुरेशी नसल्याची भूमिका रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी घेतली होती. त्यानंतर भाड्यात आणखी वाढ करत आता भाडे पहिल्या 1.5 किमीसाठी 3 रुपयांनी आणि त्यानंतर प्रत्येक किमीसाठी 2 रुपये अशी वाढ करण्यात आली आहे.
जिल्ह्यासाठी रात्रीच्या वेळी अतिरिक्त 40 टक्के भाडे
आरटीओने दिलेल्या माहितीनुसार, आज पासून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती कार्यक्षेत्रात, 25% वाढीसह सुधारित दर मध्यरात्री ते पहाटे 5 दरम्यानच्या भाड्यासाठी लागू होतील. या तीन कार्यक्षेत्रांव्यतिरिक्त, उर्वरित जिल्ह्यासाठी रात्रीच्या वेळी अतिरिक्त 40 टक्के लागू होईल.
सामानासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 60 बाय 40 सेंटीमीटरच्या बॅगसाठी 3 रुपये मोजावे लागतील. त्याच वेळी, ऑटो चालकांना सुधारित भाड्यांसह मीटर कॅलिब्रेशनसाठी 31 डिसेंबर 2021 पर्यंत वेळ देण्यात आला आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ज्या प्रवाशांचे मीटर सुधारित भाड्यासाठी कॅलिब्रेट केलेले आहेत, त्यांच्याकडून केवळ त्या ऑटोचालकांना सुधारित भाडे घेण्याची परवानगी असेल," असे पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी सांगितले.
रिक्षा भाडे वाढ : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्या दीड किलोमीटरसाठी मोजावे लागणार २१ रुपये - महागाई
महागाईने त्रस्त असलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांना आता आपला खिसा आणखी रिकामा करावा लागणार आहे. कारण आज पासून रिक्षा भाड्यामध्ये वाढ झाली आहे.आता पहिल्या 1.5 किमीसाठी 18 रुपयांऐवजी 21 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यानंतर प्रत्येक किमीसाठी 14 रुपये नागरिकांकडून भाडे स्वीकारले जाईल असे पुणे विभागाच्या आरटीओने (RTO) स्पष्ट केले आहे.