पुणे : शहरांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात रिक्षा आहेत.त्या रिक्षा व्यवसाय मुख्यत सीएनजीवर चालतात आणि त्याचे भाव रोज वाढत आहेत. गेल्या चार महिन्यापासून सीएनजीचे भाव हे सातत्याने वाढत आहेत. 68 रुपये सीएनजीचा भाव होता.तो आता 85 रुपये पर्यंत गेलेला असून आणखी भाव वाढतच आहे. त्यामुळे रिक्षा चालकावरती महिन्याचा खर्चात चार ते पाच हजार रुपयाची वाढ झालेली आहे. आणि व्यवसाय करणं त्यांना परवडत नसल्यामुळे राज्य शासनाने सीएनजी भावसुद्धा पेट्रोल आणि डिझेल प्रमाणे टॅक्स कमी करून करावे अशी मागणी पुण्यातील रिक्षा चालकांनी (Rickshaw puller Pune) केली आहे.
राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जनहिताच्या निर्णयांचा सपाटा लावला आहे. राज्यातील शिंदे-भाजप सरकारने गुरुवारी जनतेला मोठा दिलासा दिला आहे.सरकारने इंधरावरील मुल्यवर्धीत करात (Maharashtra Reduce VAT On Petrol Diesel) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्यात पेट्रोल-डिझेलचे दरात (Petrol-Diesel Price Cut) कपात होणार आहे. राज्यात पेट्रोल प्रतिलिटर 5 तर डिझेल प्रतिलिटर 3 रुपयांनी स्वस्त केले तरी चार महिन्यापासून सीएनजीचे भाव हे सातत्याने वाढत आहेत. सकाळी भाव वाढलेले दिसतात कधी दुपारच्या गॅस भरला आणि संध्याकाळी गॅस वर गेलो तर भाव वाढलेले दिसतात. त्यामुळे हे भाव वाढची अनिश्चित आहे. टॅक्स कमी करून आम्हाला सुद्धा दिलासा देण्याची मागणी शहरांतील रिक्षा चालकांची केली आहे.
हेही वाचा : मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या पॅकेजवर पुण्यातील रिक्षाचालक समाधानी, मात्र...