पुणे - भारतामध्ये बालगुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून ते 71 टक्के प्रमाण आहे महाराष्ट्रात 2019 च्या आकडेवारीनुसार 43 हजार बालगुन्हेगारीचे संख्या आहे हे प्रमाण रोखण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांबरोबर संवाद साधण्याची गरज आहे, असे आवाहन निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी पुण्यात एका कार्यक्रमात केले. "विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना अल्पवयीन मुलांचे गुन्हेगारीकडील पहिले पाऊल-पालक व समाजाची जबाबदारी ''या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते
यावेळी मार्गदर्शनपर बोलतानाबर्गे म्हणाले की, - करोनाच्या काळात ऑनलाइन शिक्षणाचा काहीसा दुष्परिणाम मुलांवर झाला. या काळात मुलांना मोबाईलवरील अभ्यास करताना मोबाईलमधील काही वाईट गोष्टीचा संबंध आला. त्याचा परिणाम मुलांवर झाला. त्यामुळे पालकांनी इयत्ता 10 वी 12 वी पर्यन्त शिक्षण घेत असलेल्या मुलांना मोबाईल देण्याचे टाळावे. पालकांनी मुलांसमोर चांगले संबंध व वर्तन ठेवावे. पत्नी व कुटुंबातील प्रत्येक सदस्यांबरोबर सभ्य भाषेत संवाद साधावा. मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी संवाद साधण्याची आवाहन त्यांनी यावेळी केले.
करियरच्या संधी निवडताना - या विषयावर मार्गदर्शन करताना वेलणकर यांनी आपल्या भाषणात खंत व्यक्त करताना सांगितले, की एनडीए, एएफएमसी सारख्या राष्ट्रीय पातळीवरच्या संरक्षण विषयावर मोफत अभ्यासक्रम, शिक्षण व प्रशिक्षण देणाऱ्या संस्था पुण्यात आहेत. परंतु पुण्याचे प्रतिनिधीत्व त्यामध्ये नाही. प्रत्येक क्षेत्रात संधी आहे. या क्षेत्राची आवड आपल्याला हवी. कष्ट करण्याची तयारी पाहिजे म्हणून करियरचा मार्ग निवडताना नावडते विषय बाजूला ठेवले पाहिजे. कार्यक्षेत्र वा अभ्यासक्रम निवडताना पुरेशी माहिती घेतली पाहिजे
राजर्षि शाहू महाराजांचे रेखाचित्र - राजर्षि शाहू महाराज स्मृती शताब्दी निमित्त शिवसह्याद्री चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे अण्णाभाऊ साठे सभागृहात राजर्षि शाहू महाराजांची रेखाचित्र रांगोळीद्वारे शाम ढवळे यांनी रेखाटले. तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी पणती लावून आदरांजली वाहिली.