पुणे - आरे आणि नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतल्यानंतर आता इतरही समाजातून आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याच्या मागण्यांचे सत्र सुरू झाले आहे. मराठा आरक्षण, भीमा कोरेगावनंतर आता धनगर आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली. धनगर नेते गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली.
हेही वाचा - भाजप सरकारमधील निर्णयांना आघाडीचा ब्रेक?
गुन्हे मागे घेऊन धनगर समाजाला न्याय द्यावा आणि धनगर समाज आरक्षण अंमलबजावणी लवकर करावी, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली. या मागण्यांसंदर्भात पुण्यात धनगर समाजाची बैठक होणार आहे. समाजाच्या बैठकीनंतर पुढील दिशा ठरवण्यात येईल. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पत्रव्यवहार करणार असल्याचे पडळकर यांनी सांगितले.