पुणे - रुबी हॉल मधील किडनी प्रत्यारोपण प्रकरणी पुण्यातील कोरेगाव पोलीस ठाण्यात हॉस्पिटलचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. परवेज ग्रँट यांच्यासह 15 जणांवर कोरोगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत डॉक्टर संजोग कदम यांनी तक्रार दिली आहे. तक्रारदार हे आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक आहेत. तसेच ज्या महिलेने पैशासाठी किडनी विकली आहे. त्या महिलेला देखील आरोपी करण्यात आले आहे. किडनी प्रत्यारोपनाचा गैरप्रकार हा रूबी हॉल हॉस्पिटलमध्ये घडल्यामुळे मॅनेजिंग ट्रस्टी हे तितकेच जबाबदार असल्यामुळे त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
15 लाखांचे आमिष - पुण्यामध्ये एका महिलेला किडनी प्रत्यारोपणासाठी किडनी देण्यास सांगून 15 लाख रुपयांचे आमिष देण्यात आले. यानंतर किडनी ट्रान्सप्लांटसाठी किडनी काढून घेतल्यानंतर पैसे देण्यास नकार देत फसवणूक करण्यात आली. असा आरोप एका महिलेने केला होता. हा सर्व प्रकार प्रसिद्ध रूबी हॉल क्लिनिकमध्ये झाला आहे. एका महिलेने याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
हेही पाहा - सहा कोटींच्या वसुली प्रकरणात मुंब्रा पोलीस ठाण्यातील दहा पोलीस निलंबित
यांच्यावर गुन्हा दाखल - अमित आण्णासाहेब साळुंखे (रा. शामा पैलेस फ्लॅट पुणे), सुजाता अमित साळुंखे, सारिका गंगाराम सुतार (रा. शाहूनगरी कोल्हापूर), आण्णासाहेब साळुंखे (रा. मु जावळा ता. सांगोला जि. सोलापूर), शंकर हरीभाऊ पाटील, सुनंदा हरीभाऊ पाटील, रवि गायकवाड, अभिजीत मदने, डॉ. परवेज ग्रँट मॅनेजींग ट्रस्टी, रेबेका जॉन, डेप्युटी डायरेक्टर मेडीकल सर्विसेस अॅन्ट मेडीकल फाऊंडेशन, रुबी हॉल क्लिनीक, ससून रोड पुणे,श्रीमती मंजुषा कुलकर्णी कायदेशीर सल्लागार,डॉ. अभय सद्रे कन्सलटंट नॅफ्रोलॉजिस्ट, रुबी हॉल क्लिनीक,डॉ. भुपत भाटी, युरोलॉजिस्ट, रुबी हॉल क्लिनीक, डॉ. हिमेश गांधी युरोलॉजिस्ट, रुबी हॉल क्लिनीक, सुरेखा जोशी, ट्रान्सप्लांट कॉर्डीनेटर अश्या 15 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.