ETV Bharat / city

Sharad Pawar : विधानभवनात बंडखोर आमदारांचं मत परिवर्तन होईल?; शरद पवार म्हणाले, 'हे सगळे विचारवंत...' - शरद पवार विधानसभा बहुमत चाचणी

गेलेले आमदार ( Rebel Shivsena Mlas ) सभागृहात ( Floor Test ) बसल्यानंतर त्यांच मतपरिवर्तन होईल, असा विश्वास काही लोकांना आहे. मला असा विश्वास नाही, असं शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी म्हटलं आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar
author img

By

Published : Jul 2, 2022, 9:04 PM IST

पुणे - शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी भाजपसोबत ( Rebel Shivsena Mlas ) जाऊन सरकार स्थापन केलं आहे. त्यानंतर आता बंडखोर आमदार मुंबईत दाखल झाले असून, उद्या ( 3 जुलै ) विधानसभेत बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहेत. त्यावर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. विधानसभेत ( Floor Test ) गेल्यानंतर हे सगळे विचारवंत काय करणार त्याच्यावर अवलंबून आहे. पण, गेलेले आमदार सभागृहात बसल्यानंतर त्यांच मतपरिवर्तन होईल, असा विश्वास काही लोकांना आहे. मला असा विश्वास नाही, असे शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

शरद पवार म्हणाले की, बंडखोर आमदारांशी माझा संपर्क नााही आहे. माझा संबंध सेनेच्या नेत्यांशी असेल आमदारांशी नाही. त्यामुळे ते आमदार उद्या नक्की काय करणार हे माहीत नाही. तसेच, अध्यक्षपदाची निवडणूक कोणाच्या अध्यक्षेतेखाली होईल याबाबत पवार यांनी म्हटलं, आता तर झिरवळ हे आहे. पण, सभागृहाने काही निर्णय घेतला तर तो निर्णय अंतिम आहे. न्यायालयात त्यांच्या विरोधात याचिका असेल तर याचा अर्थ असा होत नाही की त्यांचं पद गेलेलं आहे.

शरद पवार प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

"नुपूर शर्मा प्रकरणाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे" - नुपूर शर्मा बाबात न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, त्यासंदर्भात पवारांना विचारले असता, सर्वोच्च न्यायालयाने वक्तव्य गंभीर स्वरुपाचे आहे. केंद्र राज्य आणि गृह खात्याने याबाबत काय करावं काय पाऊल उचलावी यात स्पष्ट सांगितलं आहे. याचा गांभीर्याने विचार सर्वांनी केला पाहिजे.

"पक्षाने दिलेला व्हीप पाळावाच लागतो" - येत्या काळात महाविकास आघाडी सरकार दिसेल का?, यावरती पवार म्हणाले, अशी काहीच चर्चा आमच्यात झालेली नाही. उद्या विधानसभेत जे काही होईल त्याबाबत आमचे नेते आज बसून निर्णय घेतली. उद्या सभागृहात बहुमत सिद्ध करवाच लागेल. पक्षाने दिलेला व्हीप हा पाळावाच लागतो. पण, याबाबत काय होईल हे सगळ्यांनाच माहीत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पक्ष संघटना त्यात दोन गोष्टी एक म्हणजे विधिमंडळ पक्ष आणि दुसर म्हणजे पक्ष संघटना. मात्र, एकूणच आजच्या परिस्थितीत विधिमंडळातील पक्ष संख्या पाहता तो एकदम दुर्लक्षित करता येईल हे सांगता येणार नाही. त्यामुळे हे न्यायालयचं ठरवेल.

"राज्यापालांनी मला कधी पेढा भरवला नाही" - पुढे राज्यापालांबाबत बोलतान पवार यांनी म्हटलं, मी पण वेगवेगळ्या शपथा घेतल्या. पण, कोणत्याही राज्यपालांनी माझ्या तोंडात कधी पेढा भरवला नाही. कधीही फुलांचा गुच्छ दिला नाही. तसेच, मागील शपथ विधी वेळी अनेकांनी सुरुवातीला स्मरण करून नाव घेतली. त्यांना पुन्हा शपथ घेण्यास लावली. मात्र, यावेळी काय झाल आपण सर्वांनी पाहिले आहेच, असा टोलाही राज्यपाल कोश्यारींना शरद पवार यांनी लगावला आहे.

हेही वाचा - Sharad Pawar : 'महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्तीचा राजकारणाशी...'; शरद पवारांनी स्पष्ट सांगितलं

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.