पुण्यातील महत्त्वाच्या (Pune Important news)बातम्या :
पुण्यात लंपी चर्मरोगावर १०० टक्के लसीकरण पूर्ण : जनावराच्या लंपी चर्मरोग नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने वेळीच पावले उचलत गतीने १०० टक्के लसीकरण पूर्ण केल्यामुळे जिल्ह्यात हा आजार नियंत्रणात येत आहे. पशुसंवर्धन विभागाने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना केल्यामुळे लंपी बाधित जनावरांची संख्या कमी झाली आहे. जिल्ह्यात वेळेवर उपाययोजना केल्याने पशुधनाच्या मृत्यूचे प्रमाण कमी आहे.
बाधित जनावरांपैकी ३ हजार १४५ जनावरे बरी झाली असून १८४ दगावली आहेत. सक्रीय जनावरांपैकी त्यापैकी ६४ गंभीर आजारी आहेत. लंपीमुळे मृत्यू झालेल्या १२८ जनावरांच्या मालकांना ३० लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शिवाजी विधाटे यांनी दिली.
नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीतूनही सहकार्य करू - चंद्रकांत पाटील : जिल्ह्यातील विकासकामे वेगाने मार्गी लावायची असून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. अधिकाधिक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी शासकीय निधीसोबतच उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतूनही सहकार्य घेण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. पालकमंत्री श्री. पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार राहुल कुल, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, उप वनसंरक्षक राहुल पाटील आदी उपस्थित (Important news) होते.
पुण्यातील चांदणी चौकातील ब्रिज : दिल्ली येथील ट्वीन टॉवर ज्या कंपनीने पाडला, त्याच कंपनीला पुण्यातील चांदणी चौकातील ब्रिज पाण्याचा काम देण्यात आले. दोन ऑक्टोबरच्या मध्यरात्री तब्बल सहाशे किलो स्फोटक आणि 1350 छिद्र करून रात्री एक वाजता जेव्हा स्फोट करण्यात आला. तेव्हा पूलाचा फक्त मध्य भाग कोसळला. आणि त्यानंतर पुण्यातील या जुन्या चांदणी चौकातील ब्रिज यांनी बांधलं त्यांच्याबाबत चर्चा सुरू झाली. पुण्यातील इंजिनिअर सतीश मराठे यांनी 25 वर्षांपूर्वी हा ब्रिज बांधला होता. हा ब्रिज बांधताना त्यांनी असं काहीच वेगळं केल नाही. फक्त आपल्या कामाप्रती प्रामाणिकता दाखवली.
राज्य लोकसेवा हक्क आयोग पुणे महसुली विभाग कार्यालयाचे भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन : लोकप्रतिनिधी, प्रशासनातील उच्चपदस्थापासून शेवटच्या स्तरातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपण जनतेच्या सेवेसाठीच आहोत; नागरिकांची सेवा हीच सर्वश्रेष्ठ सेवा आहे या भूमिकेतून काम करावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. पुणे महानगरपालिकेच्या ढोले रोड क्षेत्रीय कार्यालय इमारतीमध्ये सुरू करण्यात आलेल्या राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या पुणे महसुली विभाग नवीन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार उमा खापरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग मुख्य आयुक्त दिलीप शिंदे, राज्य सेवा हक्क आयुक्त नाशिक चित्रा कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग माजी मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय, मनपा आयुक्त विक्रम कुमार, पुणे शहर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित (important news pune) होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाकाल मंदिर कॉरिडॉरचे लोकार्पण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाकाल मंदिर कॉरिडॉरचे लोकार्पण करण्यात आले. उज्जैन येथे होणाऱ्या महाकाल लोक लोकार्पण कार्यक्रमनिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे मंगळवार दि. ११ ऑक्टोबर रोजी राज्यात ५०० शिवालयांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, असून त्यानिमित्त आज पुण्यात ओमकारेश्वर मंदिर, शनिवार पेठ येथे भाजपतर्फे महा आरती करण्यात आली. या महाआरतीला खासदार गिरीश बापट, आमदार श्रीकांत भारतीय, भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, नगरसेवक गणेश घोष, धीरज घाटे,सृनील माने व भाजपचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाकाल मंदिर कॉरिडॉरचे लोकार्पण माझ्या कार्यकर्त्यांना एका शॉर्ट फिल्म वर दाखवण्यात आले.जगदीश मुळीक म्हणाले- भारतासाठी ऐतिहासिक दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाकाल मंदिर कॉरिडॉरचे लोकार्पण करण्यात येत आहे. याचा आम्हाला आनंद वाटत आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून भारताच्या विकासात भरपूर कष्ट केले. आज आम्ही या दिवसाचे साक्षीदार होत आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
वारकरी सेवेचे कार्य अखंडपणे सुरू ठेवा - राज्यपाल : पंढरपुरला पायी जाणाऱ्या वारकरी बांधवांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आलेला जिज्ञासा उपक्रम महत्वपूर्ण आहे. वारकऱ्यांची सेवा सर्वश्रेष्ठ सेवा असून सेवेचे हे कार्य अखंडीतपणे सुरू ठेवा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. सर परशुराम महाविद्यालयातील सभागृहात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र व विद्यार्थी निधी पुणे यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला डॉ.श्रीराम सावरीकर, देवदत्त जोशी, प्रा.प्रगती ठाकूर, रोहन मुटके आदी उपस्थित होते. देशाला बलशाली बनविण्यासाठी सामाजिक उपक्रमात प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. देशासाठी त्याग व सेवा देण्यासाठी प्रत्येकाने पुढे यायला हवे. देशासाठी योगदान देणारांचा कायम सन्मान केला जातो. उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी दशेत जपलेला सेवाभाव अत्यंत महत्त्वाचा असल्याचेही कोश्यारी यांनी (important news) सांगितले.
राष्ट्रवादीचा जन्मच खंजीरातून झाला -आमदार गोपिचंड पडळकर : राष्ट्रवादीसोबत जाणारे संपतात, हा इतिहास आहे. शिवसेनेच्या बाबतीत पवारांनी आपले स्वप्न पूर्ण करून दाखवले, अशी घनाघात आमदार गोपिचंड पडळकर यांनी बारामतीत केला. निवडणूक आयोग कोणताही दुजाभाव करत नाही. उलट शिवसेना-राष्ट्रवादीला एकत्र करून आयोगाने खंजीर हे चिन्ह द्यायला हवे होते, अशी खोचक टीका त्यांनी केली. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. पडळकर पुढे म्हणाले, शिवसेनेला मशाल चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवायला वेळ लागेल. त्याऐवजी या दोन पक्षांनी एकत्र येत खंजीर चिन्ह घ्यायला हवे होते. राष्ट्रवादीचा जन्मच खंजीरातून झाला आहे. राष्ट्रवादीचे चिन्ह गोठवून या दोघांना खंजीर चिन्ह द्यायला हवे होते, असे पडळकर म्हणाले.अजित पवार यांनी केलेले बंड फसले. बंडानंतर अवघे दोन आमदार त्यांच्यासोबत राहिले. या उलट हिंदूत्वाच्या मुद्द्यावर बंड करणाऱया एकनाथ शिंदे यांच्यासोबत ५० आमदार गेले. त्यामुळे सरस कोण हा संदेश जनतेत गेला. भाजपने मन मोठे करत मराठा समाजाचा मुख्यमंत्री केला. फसलेले बंड आणि मराठा समाजाचा मुख्यमंत्री हेच पवार यांच्या दुखण्याचे मूळ असल्याचे पडळकर म्हणाले.
बाबा आढावांचा विद्यार्थ्यांच्या धरणे आंदोलनाला पाठिंबा : पुणे विद्यापीठांमध्ये विद्यापीठ संघर्ष कृती समिती द्वारा फीवाढ विरोधात धरणे आंदोलनाला विद्यार्थी बसले आहेत. कामगार नेते बाबा आढाव यांनी या विद्यार्थ्यांच्या धरणे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलनात सहभाग घेतलेला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून परीक्षा शुल्क शैक्षणिक शुल्क आणि वस्तीग्रह शुल्क हे दुप्पट करण्यात आलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नसताना शिक्षण कसे घ्यायचे ? हा खूप मोठा प्रश्न आहे. त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पुणे विद्यार्थी संघर्ष कृती समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या संघर्ष कृती समितीने आज पुणे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर धरणे आंदोलनाला सुरुवात केलेली आहे.