पुणे - मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील औद्योगिक वसाहतीमधील एसव्हीएस या कंपनीला सोमवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत 18 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या 18 कामगारांमध्ये 15 महिला कामगार आहेत. सकाळीच मी माझ्या मंडळीला कंपनीत सोडलं आणि त्यानंतर मी कामावर गेलो. दुपारच्या सुमारास मला कंपनीत असताना कळालं की माझ्या मंडळींच्या कंपनीत आग लागली आहे. पण हे माहीत नव्हतं की त्या आगीत माझ्या पत्नीला काही झालं आहे. पण तिथं गेल्यानंतर जे चित्र पाहिलं ते भयावह होतं. संपूर्ण कंपनी जळून खाक झाली होती. आई गेल्याने आता मुलांचे हाल होतील, अशी भावना मृत महिला कामगाराच्या पतीने व्यक्त केली.
कंपनीने सेफ्टीसाठी काय केले?
मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील औद्योगिक वसाहतीमधील एसव्हीएस या कंपनीला फक्त एक छोटेसे गेट लावण्यात आले होते. कंपनीला फक्त एक खिडकी आणि एक लहान दरवाजा होता. मग कसे लोकं बाहेर निघतील? असा प्रश्न मृतांच्या आणि जखमींच्या नातेवाईकांनी उपस्थित करून कंपनीच्या सेफ्टीबाबतच प्रश्न उपस्थित केला आहे.