पुणे - कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आजघडीला पुण्यात 1400 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. पुण्यातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असणारे 69 क्षेत्र प्रतिबंधित (कंटेन्मेंट झोन) म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
या क्षेत्रातून शहरात जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. नागरिकांना बाहेर फिरण्यासही मनाई करण्यात आली आहे, असे असतानाही अनेक नागरिक बाहेर फिरताना दिसून येतात. त्यामुळे या भागात आता रॅपिड अॅक्शन फोर्सचे जवान तैनात करण्यात येणार आहेत.
या जवानांची एक तुकडी पुण्यात दाखल झाली आहे. या तुकडीने शहरातील सहकारनगर, धनकवडी, बालाजीनगर परिसरातून फ्लॅगमार्च काढला आहे. कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, त्यांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करावे यासाठी कंटेन्मेंट झोनमध्ये रॅपिड अॅक्शन फोर्सचे जवान तैनात करण्यात येणार आहेत.