पुणे : मुलांस आणि पतीला जीवे मारण्याची धमकी देत नगरसेवकाच्या मुलाने एका महिलेवर सातत्याने बलात्कार केल्याचा धक्कादायक ( Pune Corporator Son Rape Case ) प्रकार समोर आला आहे. समीर बंडुतात्या गायकवाड (रा. मुंढवा गाव) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मुंढव्यातील एका 32 वर्षाच्या महिलेने मुंढवा पोलिस स्थानकात तक्रार दिली आहे ( Mundhwa Police Register Case Sameer Gaikwad ).
याबाबत मिळालेली माहितीनूसार, संबंधित महिलेचा भाजी विक्री करण्याचा व्यवसाय आहे. समीर गायकवाड भाजी घेण्यासाठी फिर्यादीच्या घरी येणे जाणे होते. मागील दीड वर्षांपासून फिर्यादी या एकट्या घरात राहत असताना समीर घरी यायचा आणि मुलांना व पतीस जीवी मारण्याची धमकी देऊन त्यांच्यावर बलात्कार करायचा. या धमकीमुळे फिर्यादीने कोणालाच हा प्रकार सांगितला नव्हता. त्यानंतर समीर गायकवाड हा फिर्यादी यांच्याशी पुन्हा जबरदस्तीने शरीरसंबंध करीत होता. त्यावेळी फिर्यादीचे पती व मुलाने हा प्रकार पाहिला. तेव्हा त्याने त्यांना मारण्याची धमकी देऊन निघून गेला. या प्रकारानंतर आता त्यांनी मुंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी समीर गायकवाड याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
महिलेविरुद्ध खंडणीची तक्रार
नगरसेवक सुनिल उर्फ बंडु जयवंतराव गायकवाड यांनी आपल्याकडून जबरदस्तीने खंडणी मागितल्याचा आरोप करीत महिलेविरुध्द मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. समीर हा फिर्यादी महिलेशी बोलत असताना त्याने तिचा विनयभंग केला. असे खोटे भासवून त्याच्याविरुध्द विनयभंगाची तक्रार देण्याची आणि प्रतिष्ठेस बाधा आणण्याची भिती दाखवत संबंधित महिला तिचा पती, मुलगा व त्यांची आई, भाऊ यांनी आपल्याला जबरदस्तीने 3 लाख रुपये देण्यास भाग पाडल्याचे सुनिल गायकवाड यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
हेही वाचा - Radhanagari Dam Kolhapur : राधानगरी धरणाचा दरवाजा उघडल्यानंतर अडकला; मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू