मुंबई - अभिनेता रणवीर सिंग न्यूड फोटोशूटमुळे खूप चर्चेत आला आहे. अमेरिकेतील पेपर या इंग्रजी मासिकासाठी रणवीरने हे न्यूड फोटोशूट केले आहे. त्यातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यानंतर सर्वत्र रणवीरवर टीका होऊ लागली आहे. दरम्यान, रणवीर विरुद्ध महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे तक्रारही करण्यात आली आहे. वकिल आशिष राय यांनी ही तक्रार राज्य महिला आयोगाकडे केली आहे.
काय आहे तक्रारीत? - बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगची तक्रार महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे करण्यात आली आहे. असे फिर्यादीत म्हटले आहे. आशिष राय यांनी सांगितले की, नग्न फोटोशूट अभिनेता रणवीर सिंगने केले होते आणि ते सोशल मीडिया ट्विटर अकाउंटवरून प्रसारित झाले होते. त्यानंतर चेंबूर पोलीस ठाण्यात अभिनेता रणवीर सिंगविरुद्ध आयपीसी आणि आयटी कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
ट्विटर अकाउंटवरून डिलीट करावा अशीही मागणी - सोशल मीडियाच्या ट्विटर अकाऊंटवरून ज्याप्रकारे हे फोटो व्हायरल करण्यात आले आहेत. ते नक्कीच महिला आणि लहान मुलांच्या प्रतिष्ठेच्या विरोधात आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अभिनेता रणवीर सिंगला आयोगाच्या वतीने नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच, हा वादग्रस्त फोटो सोशल मीडिया ट्विटर अकाउंटवरून डिलीट करावा अशीही मागणीही केली आहे. तसेच, महिला आयोगाकडे स्वत:हून दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
रणवीरला अनेकांचे समर्थन? - रणवीर सिंगच्या या फोटोशूट नंतर अनेक कलाकारांनी त्याच्या या फोटोशूटचे कौतुक करत त्याला पाठिंबा दिला आहे. यामध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचाही समावेश आहे. राम गोपाल वर्मा यांनी सांगितले आहे की, जर महिला त्यांचे शरीर दाखवू शकतात तर पुरुष असे का करू शकत नाही? याशिवाय रणवीरच्या फोटोशूट समर्थन करताना त्यांनी हे लैंगिक समानतेचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे.
माझा आवडता सहकलाकार - अर्जुन कपूर म्हणाला आहे की, जर रणवीर हे सर्व करून आनंदी असेल. तर याचा आपण सर्वांनी आदर करायला हवा. अभिनेत्री आलिया भट्टने देखील रणवीरचे समर्थन केल आहे. ती म्हणाली की, माझा आवडता सहकलाकार रणवीर सिंगबद्दल कोणतीही नकारात्मक चर्चा मी सहन करू शकत नाही. त्यामुळे मी हा प्रश्न देखील सहन करू शकत नाही.
हेही वाचा - काँग्रेसने संसदेत माफी मागावी, आधीर रंजन यांच्या 'राष्ट्रपत्नी' शब्दावर भाजप आक्रमक