ETV Bharat / city

Rambo Circus : रॅम्बो सर्कसचे ३१ व्या वर्षात पदार्पण.. कलाकारांचा जगण्यासाठीचा संघर्ष, कोरोनाकाळात आर्थिक संकट

गेल्या तीन दशकांपासून पुण्यासह राज्यातील नागरिकांचे मनोरंजन करणाऱ्या रॅम्बो सर्कसने आज ३१ व्या वर्षात पदार्पण केले आहे. मात्र कोरोना काळापासून या सर्कशीतील कलाकारांचा जगण्यासाठीचा संघर्ष सुरु ( Rambo Circus Artist Struggle For Survival In Pune ) आहे. पाहुयात याबाबतचा स्पेशल रिपोर्ट..

रॅम्बो सर्कसचे ३१ व्या वर्षात पदार्पण.. कलाकारांचा जगण्यासाठीचा संघर्ष, कोरोनाकाळात आर्थिक संकट

author img

By

Published : Jan 26, 2022, 10:48 PM IST

पुणे : भारतीय सर्कस सध्या आर्थिक अडचडीतून जात असून, कोरोना संकटामुळे त्यात भर पडली आहे. गेली २ वर्षे कोरोना परिस्थितीमुळे सर्कसचे प्रयोग बंद होते. रॅम्बो सर्कस ही पुण्याची ( Rambo Circus Pune ) सर्कस असून, ३१ वर्षांपूर्वी २६ जानेवारी १९९१ रोजी प्रजासत्ताक दिनी पी. टी. दिलीप यांनी ही रॅम्बो सर्कस सुरु केली. रॅम्बो सर्कसचा ३१ वा वाढदिवस आज सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक बस स्टँड समोर, फन टाईम मल्टिप्लेक्सच्या मागे चालू असणाऱ्या रॅम्बो सर्कसमध्ये साजरा केला गेला. २५ एड्सग्रस्त लहान मुलांनी विदुषक व अन्य कलावंतांना पुष्प गुच्छ देऊन आनंद व्यक्त केला. विदुषकांच्या हस्ते व सर्कस कलावंतांच्या उपस्थितीत टाळ्यांच्या गजरात केक कापण्यात आला. यावेळी सर्व सर्कस कलावंत व विधुषकांनी एड्सग्रस्त लहान मुलांसमवेत हातात छोटे तिरंगी झेंडे घेऊन ‘भारत माता कि जय’, ‘सर्कस चिरायू हो’ अशा घोषणा देत सर्कस बँडसह फेरी मारल्या.

रॅम्बो सर्कसचे ३१ व्या वर्षात पदार्पण.. कलाकारांचा जगण्यासाठीचा संघर्ष, कोरोनाकाळात आर्थिक संकट

कोरोना काळात खूप नुकसान..

कोरोनाला जेव्हा सुरवात झाली तेव्हा पासून ते आत्तापर्यंत खूप आर्थिक संकटाला सामोरे जावं लागलं ( Rambo Circus Artist Struggle For Survival In Pune ) आहे. सर्व कलाकार हे २ वर्ष इथेच होते. त्यामुळे एक तर सर्कस बंद त्यात जागेच भाडं सुरूच होत. कधीकधी तर दिवसभर उपाशी राहावं लागतं होत. कोणीही या काळात आम्हा सर्कस कलाकारांना मदत केली नाही. या कोरोनाकाळात जो त्रास आणि जे नुकसान झाले आहे ते कधीही न भरता येणारे आहे, अशी भावना यावेळी काही कलाकारांनी व्यक्त केली.

आत्ता 50 टक्के उपस्थितीत सुरू आहे सर्कस

गेल्या ८ जानेवारीपासून पुण्यातील वडगाव येथे रॅम्बो सर्कसला सुरवात झाली असून, ५० टक्के क्षमतेने सर्कस सुरू आहे. ७५० नागरिकांना बसण्याची व्यवस्था असताना फक्त ३५० नागरिकांनाच बसविले जात आहे. 'नो मास्क नो एन्ट्री' आणि सोशल डिस्टनसिंगचा पुरेपूर वापर केला जात आहे. सर्कस जरी आत्ता सुरू झाली असली तरी, अजूनही नागरिकांचा पाहिजे तसा प्रतिसाद नाही. जोकर म्हणून काम करत असताना लहान मुलं आकर्षणाने जवळ येत होती. पण आत्ता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार हात लांबच आणि तेथूनच मुलं हाय बाय करतात, असं म्हणत काही कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सर्कसमध्ये ६० कलावंत असून दिवसभरात होतात २ शो

रॅम्बो सर्कसचे रोज दुपारी ३.३० आणि सांयकाळी ६.३० अशे दोन शो होतात. तिकिट दर १५० रु, २५० रु, ३५० रु व ५०० रु असून पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था आहे. सर्कसमध्ये ६० कलावंत असून ७५० प्रेक्षक क्षमता आहे. सध्याच्या नियमानुसार ५० टक्के प्रेक्षकांनाच प्रवेश दिला जातो. सर्कसमध्ये फ्लायिंग ट्रापिज, डबल बॅलन्स, कॉमिक जगलिंग, लॅडर बॅलन्स, नावाव पट्टी, कॅनडाल, रोला बोला, बेबी रोप, वाटर शो, स्टिक बॅलन्स, क्यूब, डॉग शो, रिंग डान्स, क्लाऊन, लॅशो, गारमन वेल्स, एरियाल, सायकल स्पेशल, सायकल एक्रोबॅट्स, रिंग ऑफ डेथ आणि फिनाले इत्यादी मनोरंजक खेळ व कसरती सादर केल्या जातात. सर्कसचा मुक्काम फेब्रुवारीअखेरपर्यंत सिंहगड रोड येथे असणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.