ETV Bharat / city

Dates Prices Hike before Ramadan : दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त रमजान होणार साजरा; खजुरांच्या किमतीत 5 ते 10 टक्के वाढ - price of dates

मुस्लिम बांधवाच्या पवित्र रमजान महिन्याला येत्या 3 एप्रिलला ( holy month of Ramadan ) सुरवात होणार आहे. रमजान निमित्ताने शहरातील विविध बाजारपेठा सजू लागल्या ( market on the occasion of Ramadan ) आहेत. उपवास सोडण्यासाठी पुण्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मार्केटयार्डमध्ये 50 ते 60 प्रकारचे खजूर बाजारात उपलब्ध आहेत. त्यात सर्वाधिक मदिना येथून आलेल्या खजुराला विशेष पसंती दिली ( dates from Medina in India ) जात आहे.

खजुराच्या किमतीत वाढ
खजुराच्या किमतीत वाढ
author img

By

Published : Mar 29, 2022, 3:14 PM IST

Updated : Mar 29, 2022, 3:50 PM IST

पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली 2 वर्ष सर्वच सण उत्सव हे साध्या पद्धतीने साजरा करण्यात आले आहेत. कोरोनाची रुग्णसंख्या कमी होताना निर्बंध शिथिल झाले आहेत. तब्बल 2 वर्षांनंतर निर्बंधमुक्त रमजान साजरा होणार आहे. पण यंदाही नागरिकांना महागाईचा फटका बसला आहे. रमजानमध्ये महत्त्वाच समजल्या जाणाऱ्या खजुरांच्या किंमतीत 5 ते 10 टक्के वाढ झाली आहे.

मुस्लिम बांधवाच्या पवित्र रमजान महिन्याला येत्या 3 एप्रिलला ( holy month of Ramadan ) सुरवात होणार आहे. रमजान निमित्ताने शहरातील विविध बाजारपेठा सजू लागल्या ( market on the occasion of Ramadan ) आहेत. उपवास सोडण्यासाठी पुण्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मार्केटयार्डमध्ये 50 ते 60 प्रकारचे खजूर बाजारात उपलब्ध आहेत. त्यात सर्वाधिक मदिना येथून आलेल्या खजुराला विशेष पसंती दिली ( dates from Medina in India ) जात आहे.

खजुरांच्या किमतीत 5 ते 10 टक्के वाढ

हेही वाचा-Shiv Bhojan Thali : शौचालयात धुतल्या जातात शिवभोजनामधील थाळ्या; यवतमाळमधील व्हिडिओ व्हायरल

खजूरच्या किंमतीत 5 ते 10 टक्के वाढ
रमजान जवळ आल्याने बाजारपेठांमध्ये खजूर खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. पण उन्हाळा असल्याने बाजारात ग्राहकांचा कमी प्रतिसाद आहे. तसेच मागील वर्षीच्या तुलनेत यंदा खजूरच्या किंमतीत 5 ते 10 टक्के वाढ झालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल व डिझेलच्या किमतीत वाढ होत आहे. वाढत्या पेट्रोल व डिझेल वाढीचा फटका खजुरांच्या किंमतीवर झाला आहे. मागील वर्षी 100 ते 150 रुपये किलो असलेल्या खजुराची किंमत आज 200 रुपयांच्या आसपास पोहचली आहे.

हेही वाचा-Families Boycott Yavatmal : धक्कादायक! अत्याचाराला कंटाळून साठ कुटुंबाचे जंगलात वास्तव्य

वाहतूकीच्या भाड्यामध्ये वाढ
बाजारात परदेशातून मोठ्या प्रमाणावर खजूर विक्रीला आले आहेत. इराण, इराक, सौदी परदेशातून खजूर विक्रीस भारतात येतात. या खजूरामध्ये अज्वा, कलमी, मदिना, मगजोल, फरत, सुलतान, केमिया, रुकसार, हसना, हार्मोनियम, मुज्जरब, बुरारी, गुड, अल्जेरियन असे अनेक प्रकारचे खजूर विक्रीला उपलब्ध आहेत, अशी माहिती खजुरचे व्यापारी विनोद गोयल यांनी दिली. पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या असल्याने वाहतूकीच्या भाड्यामध्ये वाढ झाली आहे. यामुळे खजुरांच्या किमतीत वाढ झाली आहे.

हेही वाचा-Withdraw All Lockdown Violation Cases : ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; कोरोना काळातील 'हे' गुन्हे घेणार मागे

१८०० रुपये किलो अशा किमतीचे खजूर विक्रीला उपलब्ध
मुस्लिम बांधव सायंकाळी उपवास सोडण्यासाठी प्रथम खजूर खाऊन उपवास सोडतात. सर्वात महाग दराने विकला जाणारा मगजोल खजूर बाजारपेठेत उपलब्ध आहे. सुमारे २५० रुपयांपासून ते १८०० रुपये किलो अशा किमतीचे खजूर विक्रीस उपलब्ध आहेत. त्यामुळे रमजान महिन्यात खजूरला महत्व आहे. कलमी, फरद या इराणी खजुराला ग्राहकांची मागणी असते. खजूर खरेदी करण्यासाठी कोंढवा, हडपसर, खेड शिवापूर, खडकी, पिंपरी, चिंचवड, लोणावळा, अहमदनगर आदी भागातून ग्राहक येतात.

Last Updated : Mar 29, 2022, 3:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.